
no images were found
नशा मुक्ती व उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळेसाठी 15 सप्टेंबरअखेर नाव नोंदणी करा
कोल्हापूर : नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, कोल्हापूर जिल्हा व नेहरु युवा केंद्र कोल्हापूर यांच्यावतीने व्यसनाधीनता या विषयी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा सप्टेंबरमध्ये होणार असून या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शंभर युवक युवतींची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक क्रीडा मंडळ, युवा मंडळ, युवक- युवतींनी (18 वर्ष पूर्ण) दि. 15 सप्टेंबर 2024 अखेर आपली नाव नोंदणी नेहरु युवा केंद्र, दुसरा मजला, जुने प्रांत कार्यालय, भवानी मंडप, कोल्हापूर येथे करावी, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकाऱ्यांनी केले आहे.
ही कार्यशाळा मोफत असून यामध्ये सहभागी युवक युवतींना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही नेहरु युवा केंद्रामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.