no images were found
सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर: सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी जिल्ह्यातील शाहुवाडी, कागल, हातकंगले, गडहिंगलज, चंदगड, आजरा आणि भुदरगड या सात तालुक्यांना या योजनेचा लाभ द्यावयाचा असून गोशाळांचे अर्ज 25 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी केले आहे.
योजनेचा उद्देश, लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती, लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज अनुषंगिक कागदपत्रे इ. बाबतची सविस्तर माहिती www.ahd.maharashtra.gov.in व www.mhgosevaayog.org या संकेतस्थळावर तसेच तालुकास्तरावर संबंधित पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुक पात्र गोशाळांनी विहित नमुन्यातील अर्ज आपल्या संबंधित तालुका पंचायत समिती येथील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांना संपर्क साधून विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आपल्या संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावेत. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे थेट सादर केलेले तसेच ई-मेल किंवा तत्समद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
या योजनेअंतर्गत यापुर्वी सादर करण्यात आलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नसल्याने इच्छुक पात्र गोशाळांनी विहित नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे अनिवार्य असल्याचेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.