
no images were found
शहरात स्वच्छता मोहिमेअंतर्गत 7 टन कचरा उठाव
कोल्हापूर : शहरामध्ये पूर ओसणा-या भागामध्ये महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत शुक्रवारी 7 टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व कचरा उठाव करण्यात आला आहे. यामध्ये दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर, जामदार क्लब, सुतारवाडा, पंचगंगा तालीम परिसर, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मी नारायण मंदिर, जयंती नाला पंपीग स्टेशन, सीता कॉलनी, नाईक मळ, कारजगेमळा, रमणमळा मळा, जाधववाडी, कदमवाडी, कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, कामगार चाळ, दुधाळी गवत मंडई, सुतार वाडा, कलेक्टर ऑफिस, बापट कॅम्प, मोकाशी पॅसेज, चावरे पॅसेज, सिद्धार्थ नगर या परिसरातून हा कचरा उठाव करण्यात आला आहे. यासाठी 5 जेसीबी, 4 आयवा डंपर, 2 फायर फायटर, 2 पाण्याचे टँकर,8 ट्रॅक्टर ट्रॉली, औषध फवारणीचे 9 टॅक्टर, पाणी फवारणीचे 2 टॅक्टर, धूर फवारणीची 9 मशिन व 20 हॅन्ड पंप व महापालिकेच्या 250 सफाई कर्मचा-यामार्फत राबविण्यात आली.
हि मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार व सर्व आरोग्य निरिक्षक यांनी राबविली.