no images were found
डीकेटीईच्या १९ विद्यार्थ्यांची क्लाऊड फोरसी कंपनीत ६ लाख पॅकेजवरती निवड
इचलकरंजी( प्रतिनिधी ):-डीकेटीई ही संस्था अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्याअंतर्गतच क्लाउड फोरसी या नामांकित कंपनीने कॅम्पस इंटरव्हयूव आयोजित केला होता. या इंटरव्हयूवमध्ये डीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील १९ विद्यार्थ्यांची सहा लाख पॅकेजवरती निवड झाली आहे. क्लाऊड फोरसी चे मुख्य कार्यालय हैद्राबाद येथे असून, दूरसंचार, सॉफटवेअर, संगणक प्रणाली, मध्ये ही कंपनी सेवा देत आहे.
सध्या नोकरीच्या क्षेत्रात आय.टी. कंपन्याचा दबदबा आहे व कॅम्पस इंटरव्हयूव ही आजच्या शैक्षणिक जिवनातील अत्याआवश्यक बाब बनली असून त्यासाठी लागणारी ऍप्टीटयूड टेस्ट तसेच सॉफ्ट स्कील या सर्व बाजूंची डीकेटीईमध्ये योग्य तयारी करुन घेतली. याचाच परिणाम कॅम्पस इंटरव्हयूव मध्ये दिसत असून यावर्षी क्लाउड फोरसी या आय टी क्षेत्रातील नामांकित कंपनीने डीकेटीईच्या १९ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या निवडीमुळे नामांकित कंपन्यामध्ये प्लेसमेंटमध्ये डीकेटीईने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
डीकेटीई मध्येे कॅम्पस इंटरव्हयूवच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. तसेच विद्यार्थ्याच्या कॅम्पस इंटरव्हिवसाठी सॉफ्ट स्कील चाचणी व त्याबद्दलचे मार्गदर्शन आणि टेक्नीकल मुलाखातीसाठीही कॉलेजच्या तज्ञ प्राध्यपकांचे कडून मार्गदर्शन केले जाते. त्याचा चांगला फायदा विद्यार्थ्याना इंटरव्हयूवमध्ये होत आहे.
कंपनीमध्ये निवड झालेले विद्यार्थी – ः प्रणया पाटील, सानिया मुल्ला, ॠुग्वेदी पाटील, यश वडगांवे, नोमन खतीब, प्रेरणा दुधाणे, साक्षी गायकवाड, श्रुतकिर्ती खोत, पियुष लाले, उदीत करोशी, अभय कुलकर्णी, नम्रता गौरवाडकर, आर्या बोळाज, दिव्या चौगुले, विणा बिरादार, श्रीनिवास पारिक, सृजन हुक्केरीकर, श्रेया खोत व सायली नरबल यांची निवड करण्यात आली.
डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, आमदार व उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांना शुभेेच्छा दिल्या. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्र. संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, सर्व विभागप्रमुख , टीपीओ प्रा. जी.एस. जोशी यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.