Home Uncategorized महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

2 second read
0
0
33

no images were found

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने माहे नोव्हेंबर, २०२४ पासून सुरु होणाऱ्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून दिनांक १ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे श्री. चवरे यांनी नमूद केले आहे.
२१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी माहे ऑक्टोबर, २०२४ पासून विविध १० केंद्रांवर तर ६३ व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिमफेरी प्रत्येकी एका केंद्रावर माहे डिसेंबर, २०२४ पासून आयोजित करण्यात येणार आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. २६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात.
विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही. स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर
केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.
राज्यातील जास्तीत जास्त नाटय संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…