no images were found
एचडीएफसी बँके तर्फे गुंतवणूकीतील फसवणूकीपासून सावध राहण्यासाठी महत्त्वपूर्ण संदेश जारी
मुंबई-एचडीएफसी बँक लिमिटेड या भारतातील सर्वांत मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेतर्फे त्यांच्या ग्राहकांसाठी फसवणूक करणार्या विशेष करुन समाज माध्यमांच्या विविध मंचांवरुन गुंतवणूकीच्या संधी देऊ करणार्या योजनां विषयी जागरुक राहण्याची सुचना केली आहे. गुंतवणूकीच्या बाबतीत होणार्या फसवूणकीपासून बचाव करण्या बरोबरच ग्राहकांना सुरक्षित करण्यासाठी ही मोहिम सुरु करण्यात आली आहे.
गुंतवणूकीसाठी फसवणूक करतांना गुन्हेगार हे साधारणपणे स्टॉक्स, आयपीओज, क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन इत्यादी मध्ये गुंतवणूक करण्यावर अधिक परताव्याचे अमीष दाखवतात. यामध्ये खोटे ऑटोमेटेड गुंतवणूक मंच किंवा ॲप्स तयार केले जातात ज्या मध्ये ग्राहकांना खोटा डॅशबोर्ड तयार करुन यावर गुंतवणूकीच्या माध्यमातून अधिक परतावा देण्याचे वचन दिले जाते. अशा मंचाचा प्रसार हा समाजमाध्यमांवरुन मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि या माध्यमातून अधिक परतावा देणार्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केले जाते, अशा योजना या खोट्याच असतात. फसवणूक करणारे हे सोशल इंजिनियरींग तत्वांचा वापर करुन लोकांना फसवतात. पण जर योग्य अभ्यास करुन आणि योग्य काळजी घेऊन गुंतवणूक केल्यास फसवणूक करणार्यांपासून बचाव होतो.
या फसवणूकी विषयी जागरुक करतांना एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट इंटेलिजन्स आणि कंट्रोल चे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट श्री. मनीष अगरवाल यांनी सांगितले “ गुंतवणूकीशी संबंधित गुन्ह्याच्या केसेस मध्ये वाढ होतांना पाहून आम्ही अधिकाधिक लोकांमध्ये जागरुकता आणि या समस्ये विषयी ज्ञान देऊ करत आहोत, जेणेकरुन ग्राहक अशा फसव्या योजनांना बळी पडू नयेत. सरकार, बँका आणि नियामक अशा गुन्हांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतांना वैयक्तिक सतर्कता आणि जागरुकता ही सुध्दा अशा प्रकारच्या फसव्या योजनांपासून बचाव करण्याचा योग्य मार्ग आहे.”