Home सामाजिक सध्याची स्थिती भारतीयांसाठी फायदेशीर : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार

सध्याची स्थिती भारतीयांसाठी फायदेशीर : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार

0 second read
0
0
87

no images were found

सध्याची स्थिती भारतीयांसाठी फायदेशीर : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
मुंबई : जगाचे सध्याचे आर्थिक चित्र संमिश्र आहे. एकीकडे युद्धजन्य स्थिती, वाढती महागाई, लहरी हवामानामुळे काही देशांत ओला तर काहींमध्ये कोरडा दुष्काळ, मंदीची भेडसावणारी चिंता, काही देशांच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्था अशी स्थिती आहे. मात्र त्याचवेळी भारतासारख्या देशांना त्यातून नव्या संधीही मिळणार असून त्याचा फायदा निवासी तसेच अनिवासी भारतीयांना होईल, अशी शक्यता दुबईस्थित अल अदील उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केली आहे.
दातार म्हणाले, “ भारतातून आखाती देशांना प्रामुख्याने सागरी मार्गाने अन्नधान्य व वस्तूंची निर्यात होते. भारत संयुक्त अरब अमिरातीला मोठी निर्य़ात करतो. त्यासाठी लागणारे कंटेनर्स गेली दोन वर्षे कमी संख्येने उपलब्ध होते. त्यातही कोरोना काळात चीनकडून आयातीची मोठी मागणी असल्याने उपलब्ध कंटेनर्सचा मोठा साठा त्या मार्गावर वापरला जात होता. साहजिकच प्रति कंटेनर वाहतूक शुल्क भरमसाट वाढले होते. कंटेनरही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने हेच शुल्क साधारण तिपटीने म्हणजे प्रत्येक कंटेनरसाठी ३७५ डॉलर इतके कमी झाले आहे. ही स्थिती आखाती देशांतील अनिवासी भारतीयांप्रमाणेच अन्य ग्राहकांना दिलासा देणारी ठरेल.”
ते पुढे म्हणाले, “ संयुक्त अरब अमिरातीचे चलन दिऱ्हॅमसुद्धा भारत, पाकिस्तान, युके व युरोपीय देशांच्या चलनाच्या तुलनेत वधारले आहे. त्याचा परिणाम दुबईतील आयात स्वस्त होण्यात होईल. भारत व पाकिस्तान हे देश संयुक्त अरब अमिरातीच्या अन्नधान्य तथा खाद्य उत्पादने आयातीचे प्रमुख स्रोत आहेत. या प्रमुख पुरवठादारांकडून येणारे तांदूळ, मसाले, सुकामेवा, भाज्या व इतर खाद्य उत्पादने अमिरातीतील ग्राहकांत मोठ्या प्रमाणावर वापरतात . भारताला यंदा अनुकूल हवामानामुळे किराणा उत्पादनांच्या निर्यातीत आघाडी घेण्याची संधी आहे. युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धस्थिती सध्या शांत असल्याने तेथून निर्यात सुरू झाली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…   नवीन वर्षा…