
no images were found
कोल्हापुर डाक विभागामार्फत डाक चौपाळ उपक्रमाचे आयोजन
कोल्हापूर, : ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात, तसेच जनतेला आर्थिक लाभाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळावा व ग्रामीण भागातील आर्थिक समावेशान योजनेमध्ये समाविष्ट करावे या हेतुने गोवा क्षेत्रिय कार्यालयाच्या सुचनेनुसार “डाक चौपाळ” उपक्रमाचे आयोजन, डाक विभाग कोल्हापुर यांनी केले आहे. डाक सर्वेक्षनानुसार 18 गावांची निवड ही डाक चौपाळ या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे प्रवर डाक अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी केले आहे.