Home शासकीय आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

1 min read
0
0
20

no images were found

आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

 

 

            मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नयेपुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाहीअशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिकाअभिप्राय शासनाला कळवावेतअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळमंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटीलराधाकृष्ण विखे पाटीलछगन भुजबळरवींद्र चव्हाण,  शंभूराज देसाईदादाजी भुसेअतुल सावेधनंजय मुंडे यांच्यासह खासदार अशोक चव्हाणसुनील तटकरेज्येष्ठ नेते ॲड. प्रकाश आंबेडकरआमदार सर्वश्री प्रवीण दरेकर,  गोपीचंद पडळकरबच्चू कडूभरत गोगावलेमहादेव जानकर आदी उपस्थित होते.

            आरक्षणासंदर्भात विविध राजकीय पक्षसंघटनांची भूमिका महत्वपूर्ण असून राज्यात मराठाओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जातानाच जातीय सलोखा देखील कायम राहिला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मांडली.

            मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तो कायद्याच्या चौकटीत टिकण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. हा निर्णय घेतल्यापासून शिक्षणपद भरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना लाभ झाला आहे.  मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देतानाच अन्य समाज घटकांवर अन्याय होऊ देणार नाहीअशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. गॅझेटच्या तपासणीसाठी हैदराबाद येथे ११ जणांचे पथक पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही, तर त्यातून सामाजिक सलोखा अबाधित रहावा यासाठी शासनाची प्रामाणिक भुमिका आहे. त्या दिशेने शासनाची सकारात्मक प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. राज्यात सौहार्दपूर्ण वातावरण कायम रहावयासाठी सर्वपक्षीय सदस्यांना विश्वासात घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याबाबत आजची बैठक बोलावण्यात आली होती. मराठा आणि ओबीसी समाजातील कटुता दूर करण्यासाठी आजची बैठक होती. यापूर्वीही १ नोव्हेंबर २०२३ रोजी अशाच प्रकारे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होतीअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीसउपमुख्यमंत्री श्री. पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर मंत्री श्री. भुजबळश्री. मुंडेविधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळसर्वश्री दरेकरप्रकाश शेंडगेअशोक चव्हाणबच्चू कडूसदाभाऊ खोतॲड. आंबेडकरसुरेश धसॲड. मंगेश ससाणेकपिल पाटीलप्रशांत इंगळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…