no images were found
महापालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन 2024 च्या डायरीचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रकाशन
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन 2024 च्या डायरीचे आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन दुपारी आयुक्त कार्यालयात करण्यात आले. या प्रकाशनावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, भांडार अधिक्षक सौ.प्रिती घाटोळे, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले उपस्थितीत होते.
या डायरीमध्ये अग्निशमन विभागाचे कंट्रोल रूम व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे, अधिकारी व कर्मचा-यांचे नंबर देण्यात आले आहे. तसेच पावसाळा पुर्व उपाययोजना, विभागनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, पावसाळा कालावधी नंतरच्या उपाययोजना, राजाराम बंधारा पूर पातळी, संभाव्य पाणी येणारी ठिकाणे, निवारा केंद्राची माहिती, अग्निशमन विभागाकडील पूर नियोजनासंदर्भात माहिती, विभागीय कार्यालय क्रं.1 ते 4 कडील निवारा केंद्रांमध्ये नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांची माहिती, उद्यान विभागाकडील अधिकारी कर्मचारी यांची माहिती, पार्किंग व जनावरांनसाठी ओपन स्पेस, महापालिका क्षेत्रातील नियंत्रण कक्षाची माहिती, आपत्ती व्यवस्थापन उपलब्ध साधनांची माहिती, शहरातील बोटींग क्लबची माहिती, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व महावितरण ते मंडळ स्तरीय अधिकाऱ्यांची संपर्क यादी, सामाजिक सेवा संस्थाची यादी, हवामान खाते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय, जखमी, आजारी पक्षी व प्राणी उपचाराची माहिती, पोलिस विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची माहिती, राष्ट्रीय महामार्ग विभाग, जलसंपदा, पाटबांधारे, अधिक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ, मृद व जलसंधारण विभागांची माहिती, पावसाळा 2024 सावधानतेच्या जाहिर सूचना, पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढण्यापुर्वी करावयाच्या उपाययोजना व संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाताना व्यवसाईक, व्यापाऱ्यांनी घ्यावयाची काळजी हि सर्व माहिती या आपत्ती व्यवस्थापन डायरीमध्ये देण्यात आलेली आहे.