Home मनोरंजन हिमाचल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ‘द रॅबिट हाऊस’ ने उमटवली मोहर, ठरला उत्कृष्ठ चित्रपट

हिमाचल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ‘द रॅबिट हाऊस’ ने उमटवली मोहर, ठरला उत्कृष्ठ चित्रपट

2 second read
0
0
26

no images were found

हिमाचल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ‘द रॅबिट हाऊस’ ने उमटवली मोहर, ठरला उत्कृष्ठ चित्रपट

 

गीताई  प्रॉडक्शन्सची पहिलीच निर्मिती असलेल्या वैभव कुलकर्णी लिखित, दिग्दर्शित हिंदी चित्रपट ‘द रॅबिट हाऊस’ ला आधीच हिमाचल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून सन्मान मिळाला होता. शेवटच्या दिवशी पुरस्कार जाहीर झाले तेव्हा ‘द रॅबिट हाऊस’ ला उत्कृष्ठ चित्रपट पुरस्कार मिळाला, अभिनेत्री करिश्मा हिला उत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्कार मिळाला, तर अभिनेते गगन प्रदीप यांना उत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार हिमाचल प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव ओंकार शर्मा, बॉलिवूड कलाकार संजय मिश्रा, अखिलेंद्र मिश्रा, सत्यपाल शर्मा, सपना संद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कार दिग्दर्शक वैभव कुलकर्णी, निर्माते कृष्णा पांढरे, सुनीता पांढरे, कलाकार करिश्मा, पूर्वा, गगन प्रदीप, मोतीराम कटवाल यांनी स्वीकारले. यावेळी बॉलिवूड कलाकार पिहू संद, संजय जैस, तेलगू अभिनेता आणि दिग्दर्शक आदित्य ओम आदी मान्यवर उपस्थित होते, तर टीम ‘द रॅबिट हाऊस’ कडून सुनीता सिंग, प्रीती शर्मा, बिकीभाई ठाकूर, निमी ठाकूर, मोहित ठाकूर, मोतीराम कटवाल, देहरुराम कटवाल, हिना कटवाल, आशिष पावगी हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना अखिलेंद्र मिश्रा म्हणाले, ‘द रॅबिट हाऊस सारखा सिनेमा, सध्या ज्या पठडीतले सिनेमे येत आहेत त्यांना छेद देतो. याला खरा सिनेमा म्हणतात. ज्याच्यामध्ये साहित्यिक मूल्ये आहेत आणि तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.’ तेलगू अभिनेते आणि दिग्दर्शक आदित्य ओम म्हणाले, ‘हा सिनेमा म्हणजे मास्टर पीस आहे. मला हा तेलगूमध्ये करायची इच्छा आहे.’ हा महोत्सव हिमाचल प्रदेशची सांस्कृतिक राजधानी मंडी अर्थात छोटी काशी येथील संस्कृती सदनच्या भव्य दालनात पार पडला.

महोत्सवाच्या सांगता समारंभात, परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यात ‘द रॅबिट हाऊस’ च्या नावाने एक देवदार वृक्ष लावण्यात आला, जो पुढची अनेक वर्षे चित्रपटाची आठवण करुन देत राहिल. महोत्सवाची सुरुवात विलोभनीय मंडवी लोकनृत्य करुन स्त्रियांच्या समूहाने केली, तर सांगता समारंभात उत्तरेकडील लोकनृत्यांनी बहार आणला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…