no images were found
बँकिंग सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कोअर बँकिंग सिस्टम ला अपग्रेड करण्याची योजना
मुंबई – एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँके कडून दिनांक १३ जुलै २०२४ रोजी सिस्टम अपग्रेड चे काम हाती घेण्यात येणार आहे.
बँक आता नवीन इंजिनियर्ड मंचावर आधारीत कोअर बँकिंग सिस्टम (सीबीएस) मध्ये अपडग्रेड होणार असून यामुळे ग्राहकांना अधिक समृध्द अनुभव मिळून देशभरांतील ९.३ कोटी वैयक्तिक आणि व्यावसायिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहे. या बदला मुळे बँकेच्या कार्यक्षमतेची गती वाढेल, अधिक प्रमाणातील व्यवहार करण्याची क्षमता वाढून विश्वसनीयता आणि प्रमाणातही वाढ करणे शक्य होईल.
या अपग्रेड मुळे एचडीएफसी बँक आता आकार आणि बँकिंग प्रमाणानुसार देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बनेल आणि बँके तर्फे न्यु एज प्लॅटफॉर्मचा वापर करेल.
अपग्रेडच्या शेड्युल विषयीची माहिती :
- सुरुवात: शनिवार १३ जुलै २०२४ रोजी सकाळी ३ वाजता
- समाप्ती : शनिवारी १३ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत
बँकेने हे शेड्युल्ड अपग्रेड्स दुसर्या शनिवारी करण्याचे योजलेले आहे, कारण या दिवशी बँकेला सुट्टी आहे, जेणेकरुन ग्राहकांना कमीत कमी त्रास होईल. ग्राहकांना विनंती करण्यात येते की त्यांचे बँकिंग व्यवहार या कालावधीनुसार करावेत.