Home शासकीय जलयुक्त शिवार अभियान-2 करिता ६५० कोटी रुपयांचा निधी –  संजय राठोड

जलयुक्त शिवार अभियान-2 करिता ६५० कोटी रुपयांचा निधी –  संजय राठोड

46 second read
0
0
21

no images were found

जलयुक्त शिवार अभियान-2 करिता ६५० कोटी रुपयांचा निधी –  संजय राठोड

 

            मुंबई : शेतकरीशेतीपूरकव्यवसायउद्योगमहिलासक्षमीकरणशिक्षणव्यापारआरोग्यपर्यटनविद्यार्थीयुवकमहिलामागासवर्गीयआदिवासीअल्पसंख्याक अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा वर्ष 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. जलयुक्त शिवार अभियान-2.0 साठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय  देणाऱ्या  सर्वसमावेशक अर्थसंकल्पाचा जनतेला लाभ होणार आहे,  त्याबद्दल शासनाचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आभार मानले आहेत.

            जलयुक्त शिवार अभियान-2 अंतर्गत  मार्च 2024 अखेर 49 हजार 651 कामे पूर्ण झाली असून या आर्थिक वर्षासाठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.  गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार” योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 338 जलाशयातून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. लोकसहभागातून आतापर्यंत 83 लाख 39 हजार 818 घनमीटर गाळ काढण्यात आला असल्याचेही अर्थसंकल्पात सादर करण्यात आले आहे, असेही मंत्री राठोड यांनी म्हटले आहे.

            मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनापुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनाओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्तीमुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनामुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनाअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीद्वारे महाराष्ट्राचा अभिमानस्वाभिमान उंचावणाऱ्या अनेक निर्णयांचा अर्थसंकल्पात समावेश असल्याचे श्री. राठोड म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…