
no images were found
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी कोल्हापूरातून प्रतिनिधी रवाना !
कोल्हापूर(प्रतिनिधी) – हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही बारावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशानाठी उंचगाव येथील श्री मंगेश्वर देवालय येथे दर्शन घेऊन ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’चा जयघोष करत कोल्हापूर जिल्ह्यातून १५ विविध संघटनांचे ६२ प्रतिनिधी या अधिवेशनासाठी रवाना झाले.
या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद, ‘सनातन सत्पंथ प्रेरणापीठ कर्णावती’चे संपर्कप्रमुख श्री.घन:शामभाई पटेल आणि विश्वस्त डॉ. कांजीभाई पटेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. भगवंतराव जांभळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. संजय घाटगे यांसह अन्य उपस्थित होते.
या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच समितीच्या ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या ‘फेसबुक’द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.