Home मनोरंजन हृतिक-सैफचं ‘विक्रम वेधा’मधील अ‍ॅक्शन पॅक्ड थीम साँग ‘बंदे’ रिलीज…

हृतिक-सैफचं ‘विक्रम वेधा’मधील अ‍ॅक्शन पॅक्ड थीम साँग ‘बंदे’ रिलीज…

4 second read
0
0
102

no images were found

हृतिक-सैफचं विक्रम वेधामधील अ‍ॅक्शन पॅक्ड थीम साँग बंदेरिलीज…

हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेलं ‘विक्रम वेधा’ चित्रपटातील ‘बंदे…’ हे थीम साँग आज ऑनलाइन लाँच करण्यात आले.

‘बंदे…’ या गाण्यात विक्रमच्या भूमिकेतील सैफ अली खान आणि वेधाची व्यक्तिरेखा साकारणारा हृतिक रोशन अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतात.

या थीम साँगमधील बिटस यापूर्वी चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरमध्ये ऐकायला मिळाले होते. ‘विक्रम वेधा’च्या पार्श्वसंगीताचं कौतुक करणाऱ्या प्रेक्षकांकडून याला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.

‘विक्रम वेधा’च्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या चार दिवसांपूर्वी प्रचंड मागणी असलेलं हे थीम साँग अखेर लाँच केलं आहे.

गुलशन कुमार, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिआ स्टुडिओ आणि वायनॅाट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…