no images were found
तर एक लाख वेळा माफी मागेल; तानाजी सावंत
मुंबई : या सरकारच्या काळात आरक्षण मिळेलच पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले. त्याचबरोबर राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका घेतली असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तथापि ज्या मराठा समाजाच्या जीवावर मी कॉलर ताठ करून हिंडतो, त्याची एक वेळा नाही तर एक लाख वेळा माफी मागायची माझी तयारी आहे. मात्र माझं वक्तव्य पूर्णपणे ऐकून घ्यावं. त्याचा विपर्यास करू नये, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री आणि मराठा समाजाचे नेते तानाजी सावंत यांनी दिलं आहे. उस्मानाबाद येथील त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनाही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता स्वतः तानाजी पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणावर प्रचंड टीका केली, जातीयवाद केला गेला. फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं पण त्याच ब्राह्मणानं 2017 मध्ये मराठ्यांची झोळी भरली. मराठ्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि ज्यावेळेस जनतेचा घात करून तुम्ही सत्तेत आलात तेव्हा सहाच महिन्यात आरक्षण गेलं आणि आत्ता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. पण आम्ही आरक्षण देणार, तेही टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देणारच” असं वादग्रस्त वक्तव्य सावंत यांनी केलं होतं.