no images were found
गौतम अदानींकडे अदानी एंटरप्रायझेसचा फक्त 1 शेअर,?
मुंबई : ही गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते कीअदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या प्रवर्तकाकडे स्वतःच्या कंपनीत फारच कमी शेअर्स आहेत. कंपनीने बुधवारी आर्थिक वर्ष 2023-24 चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात एक्झिक्युटिव्हचा पगार, शेअरहोल्डिंग असे अनेक तपशील दिले आहेत. वार्षिक अहवालानुसार, अब्जाधीश संस्थापक गौतम अदानी यांच्याकडे अदानी एंटरप्रायझेसचा फक्त 1 शेअर आहे.
2023-24 या आर्थिक वर्षातील गौतम अदानी यांचा एकूण पगारही अहवालात उघड झाला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी त्यांचा एकूण पगार 2.46 कोटी रुपये होता. यामध्ये 2.19 कोटी रुपये पगार आणि 0.27 कोटी रुपयांचे भत्ते आणि इतर लाभांचा समावेश आहे. त्यांचा भाऊ राजेश अदानी यांनी आर्थिक वर्षात एकूण 8.37 कोटी रुपये कमावले.अदानी एंटरप्रायझेसने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी मोबदल्यात 12 टक्के वाढ नोंदवली आहे. यात प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी समाविष्ट नाहीत. त्यांच्यासाठी 5.37 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे. प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांसाठी वेतन समायोजन अनेक घटकांनी प्रभावित होतात. यामध्ये कंपनीची कामगिरी, वैयक्तिक कामगिरी, चलनवाढ आणि प्रचलित उद्योग कल यांचा समावेश होतो.
दरम्यान, गुरुवारी अदानी एंटरप्राइझचे शेअर्स 2.03 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. कंपनीचा शेअर 66.10 रुपयांनी घसरून 3193.10 रुपयांवर पोहोचला. तर शुक्रवारी 31 मे रोजी शेअर्स वधारून 3,314 रुपयांवर गेले आहेत. एस अँड पी बीएसई 100 मध्ये समाविष्ट असलेल्या अदानी एंटरप्रायझेसचे बाजार भांडवल 3,64,013.76 कोटी रुपये आहे. गेल्या 5 वर्षात हा शेअर्स 1935 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या दशकात शेअर्सने 5000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.