Home धार्मिक देव, देश, धर्म या साठी प्रत्येकाच्या व्यापक सर्मपणा ची आवश्यकता ! – मिलिंदजी परांडे

देव, देश, धर्म या साठी प्रत्येकाच्या व्यापक सर्मपणा ची आवश्यकता ! – मिलिंदजी परांडे

14 second read
0
0
33

no images were found

देव, देश, धर्म या साठी प्रत्येकाच्या व्यापक सर्मपणा ची आवश्यकता ! – मिलिंदजी परांडे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :- ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्या यासंह विविध समस्या सध्या हिंदूंसमोर आहेत. अचानक रावण, महिषासूर यांना आदर्श मानणारे लोक सिद्ध होत आहेत. ज्या ज्या भागात हिंदूंची लोकसंख्या अल्प होत आहे तो तो भाग असुरक्षित बनतो. ख्रिस्ती आणि मुस्लीम संस्थांना विदेशातून धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे यापुढील काळात हिंदूंनी देव, देश, धर्म यांचे कार्य व्यापक स्तरावर करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री श्री. मिलिंदजी परांडे यांनी केले. ते कणेरी मठ येथे आयोजित संत संमेलनात बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामीजी, निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामीजी, विहिंपचे प्रांतसंघटनमंत्री श्री. संजय मुद्राळे, विश्‍व हिंदु परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील उपस्थित होते. स्वागत आणि आभारप्रदर्शन विभागमंत्री श्री. शिवजी व्यास यांनी केले.
या संमेलनासाठी विहिंपचे जिल्हामंत्री श्री. अनिल दिंडे, श्री. मिलिंद लिंबाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापूरे, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, प.पू. ईश्‍वरबुवा रामदासी, प.पू. मौनी महाराज यांसह सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संत, महंत, वारकरी संप्रदायांचे प्रमुख, हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. मिलिंदजी परांडे पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यानंतर नागालँड, मिझोराम यांसारख्या राज्यांमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात धर्मांतरीत झाल्याने या राज्यात हिंदु धर्मीय अल्पसंख्य झाले आहेत. महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांमधील ग्रामीण भागांत धर्मांतराचे कार्य जोरात चालू आहे. यासाठी आपल्याला हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करावी लागेल.’’ भारत अखंड होण्याचा संकल्प परत एकदा करावा लागेल !
पूर्वी एकसंघ असलेला भारत आज खंडित झाला आहे. आपली अनेक शक्तीपिठे ही पाकिस्तान-बांगलादेश येथे आहेत. सिंधू नदी आपल्याकडे नाही. पाणिनीचे जन्मस्थान पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे हे जर परत मिळावायचे असेल, तर शास्त्र, सदाचार यांसोबत सामर्थ्य, शक्ती यांची उपासना आपल्याला करावी लागेल. जसा आपण श्रीराम मंदिराचा संकल्प पूर्ण केला त्याचप्रकारे यापुढील काळात आपल्याला भारत अखंड होण्याचा संकल्प परत एकदा करावा लागेल.
सातत्याने हिंदूंचा घटणारा जननदर ही चिंतेची गोष्ट !
भारतात हिंदूंचा जननदर हा १.९२ असून मुसलमानांना जननदर हा २.३ इतका आहे. हिंदूंची संख्या सातत्याने घटत असून शहरी भागांमध्ये ‘हम दो -हमारा एक’, अशी स्थिती आहे. लष्करामध्ये २१ सहस्त्र वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जागा युवक मिळत नसल्याने रिक्त आहेत. त्यामुळे सातत्याने घटणारा हिंदूंचा जन्मदर ही चिंतेची गोष्ट आहे, असे मत श्री. मिलिंदजी परांडे यांनी व्यक्त केले. आपण प्रत्येकाने जागृत होऊन संघटितपणे कृती करण्याची आवश्यकता ! – प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामीजी
केरळसारख्या राज्यात हिंदू आज अल्पसंख्य होत आहेत. समुद्रकिनारी हिंदू असलेले कोळी बांधव धर्मांतरीत होत आहेत. संभाजीनगरजवळ असलेले एक पूर्ण गाव ‘वक्फ बोर्डा’ने त्यांची संपत्ती म्हणून घोषित केले. याला हिंदूंनी संघटिपणे विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडला.हिंदु धर्मात आज काही संघटनांकडून विद्वेष पेरण्याचे काम चालू आहे. संत हे अखिल समाजासाठी काम करतात. दुर्दैवाने संतांनाही आज जातींमध्ये विभागण्याचे काम चालू आहे. अशा प्रकारे जातींमध्ये भांडणे लावणार्‍यांपासून आपण सावध झाले पाहिजे. देशात वर्षाला ४० सहस्त्र मुलींचे गायब होत असून या कुठे जातात ? त्यांचे पुढे काय होते यावर कुणीही गांभीर्याने विचार करत नाही. त्यासाठी आपण प्रत्येकाने जागृत होऊन संघटिपणे कृती करण्याची आवश्यकता आहे.’ या वेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगते अशी –
या प्रसंगी विविध मान्यवरांनी धर्मकार्यात ते कशाप्रकारे योगदान देऊ शकतात, तसेच ते कशाप्रकारे धर्म प्रसाराचे कार्य करत आहेत या संदर्भात त्यांचे अनुभव, तसेच या संदर्भातील त्यांच्या सूचना केल्या. श्री. सुहास लिमये, श्री. मयुर कुलकर्णी, श्री. केसरकर, श्री. संजय खाडे, श्री. संग्रामसिंह खाडे यांसह अन्य मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी लिंगेश्‍वर (जिल्हा सांगली) येथील साध्वी जानकीमाताजी म्हणाल्या, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून सागरेश्‍वर अभयारण्य येथे असलेले श्रीराम मंदिर हे वनक्षेत्रात असून तेथे उपासना करणे, पूजा करणे यांसह विविध धार्मिक कृती करतांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. येथे त्यासाठी यातून मार्ग निघण्यासाठी प्रयत्न व्हावेत.’’ या संमेलनास कोल्हापूर सह सांगली – सातारा सह सीमा भाग – तळ कोकणातील विविध धार्मिक संप्रदाय – मठ – मंदिर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते . तर सांयकाळी विहिप च्या निमंत्रित स्नेह मेळाव्यात केंद्रीय संघटक मिलिद परांडे यांनी हितगुजपर संवाद साधला . आणि सर्वाच्या शंकाचे निरसन केले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आ…