no images were found
“ती मला स्टाईल आणि फॅशनबद्दल बरंच काही शिकवते”
झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’ने आपल्या रोचक, रोमांचक आणि नाट्यमय कथानकासह प्रेक्षकांना त्यांच्या खुर्च्यांना खिळवून ठेवले आहे. ह्या मालिकेत 20 वर्षांची झेप घेतल्यानंतर आता विभक्त झालेली जोडी रणबीर (कृष्णा कौल) आणि प्राची (मुग्धा चाफेकर) यांच्या मुली पूर्वी (राची शर्मा) आणि खुशी (सिमरन बुधारूप) यांच्या जीवनप्रवासाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रेक्षकांनी हल्लीच पाहिले की कसे अनेक विवाद असूनही राजवंश ऊर्फ आरव्ही (अब्रार काझी) आणि पूर्वी यांच्या मनात एकमेकांबद्दल भावना निर्माण झाल्या आहेत. परिस्थितीमुळे आरव्ही आणि पूर्वी हे ऑनस्क्रीन एकत्र येऊ शकत नाहीयेत, पण खऱ्या आयुष्यात कलाकार अब्रार आणि राची हे मात्र चांगले दोस्त बनले आहेत.
ह्या मालिकेच्या चाहत्यांना ह्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आवडत असून त्यांच्यासाठी #RajVi हा हॅशटॅगही बनवण्यात आला आहे. कथानकाच्या मागणीनुसार, हे दोघे ऑनस्क्रीन अनेकदा भांडताना आणि वाद घालताना दिसून येतात, पण ऑफस्क्रीन मात्र त्यांची दोस्ती अधिकाधिक घट्ट होत चालली आहे. ते केवळ एकमेकांचे चांगले दोस्तच नाहीत तर एकमेकांना त्यांची दृश्ये सुधारण्यासाठी आणि एकमेकांमधील सर्वोत्तम बाहेर आणण्यासाठी मदतही करताना दिसून येतात. अब्रारला तर राचीची स्टाईलही अतिशय आवडते आणि फॅशनबद्दल तो तिच्याकडून खूप काही शिकत आहे.
अब्रार म्हणाला, “माझी आणि राचीची दोस्ती प्रेक्षकांना ऑनस्क्रीन जे काही पाहायला मिळतं त्यापेक्षा अर्थातच वेगळी आहे. ती केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक चांगली व्यक्तीसुद्धा आहे. ती अतिशय दयाळु आणि समर्थन देणारी सहकलाकार आहे. आम्ही दोघे एकमेकांपेक्षा अगदी विरूद्ध आहोत आणि मला वाटतं त्यामुळेच आमची दोस्ती अधिक दृढ बनली आहे आणि आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणखी छान बनली आहे. आम्हांला एकमेकांबद्दल अनेक गोष्टी शिकायला मिळत असतात आणि आता तिच्यासोबत मी एवढा वेळ घालवला आहे की तिच्याबद्दल एक गोष्ट मी सांगू शकतो की ती मला स्टाईल आणि फॅशनबद्दल खूप काही शिकवते. पोशाख, शूज आणि अॅक्सेसरीजच्या बाबतीत ती ज्यापद्धतीने अगदी सुयोग्य कॉम्बिनेशन्सची निवड करते ते अगदी वाखाणण्यासारखे आहे. ती अगदी प्रो आहे. मला वाटतं आम्ही एकमेकांसाठी ऑनस्क्रीन अगदी अनुरूप आहोत आणि तिच्याहून अधिक चांगली सहकलाकार मला मिळूच शकली नसती.”
नाट्यमय वळणांनी भरलेला ह्या ट्रॅकचे चित्रीकरण करताना अब्रार आणि प्राचीला अतिशय मजा येत असून राजवंश आणि पूर्वी यांच्यातील जवळीक त्यांना एकत्र आणेल की मोनिषा सृष्टी जैन त्यांच्यासाठी आणखी अडथळे निर्माण करेल हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोचक ठरेल.