
no images were found
शिवाजी विद्यापीठात ‘व्यवस्थापन विकास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न
कोल्हापूर(प्रतिनिधी): ‘भविष्य काळातील काम, कामाचे ठिकाण आणि मानवी संसाधने’ (फ्युचर ऑफ वर्क, वर्कप्लेस अँड ह्यूमन रिसोर्स) या मुख्य विषयावर एक दिवसीय व्यवस्थापन विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन केले
होते. विद्यापीठाच्या शाहू सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्दघाटन शिवाजी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंचावर भारत फोर्जचे संचालक मानव संसाधन डॉ. संतोष भावे, कॅडमॅक्स एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक श्री. अरुण कुमार पाटील, कोल्हापूर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अभिजीत अवसरे, डी. के. टी. ई. सोसायटीच्या वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी संस्थेच्या सचिव डॉ. सपना अवाडे, वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्र-संचालक डॉ. नितीन माळी, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अमोल मिणचेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्र-संचालक डॉ. नितीन माळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रसिद्ध विधीज्ञ आदित्य जोशी, विधीज्ञ पार्थ पती व विधीज्ञ दिपक जोशी यांनी ‘कामगार आणि उद्योगामधील नवीन कायद्यातील ट्रेंडचा अवलंब करून काम, कार्यस्थळ आणि मानवी संसाधनांवर प्रभाव’ या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर झालेल्या पॅनल चर्चा एक मध्ये कल्याणी ग्रुपचे मानव संसाधन श्री. अरुण फुलेरा, विलो माथेर आणि प्लॅट पंप्स प्रा. लि.चे मानव संसाधन नितीन असलकर, बी. एन. वाय मेलोंनचे उपाध्यक्ष मानव संसाधन श्री. बळिराम मुतगेकर, भारत फोर्जचे मानव
संसाधन व्यवसाय भागीदार श्री. श्रेयश किरपेकर यांनी ‘कामाच्या वातावरणावर नवीन तंत्रज्ञानाचा प्रभाव’ या विषयावर मार्गदर्शन केले. या पॅनेल चर्चाच्या समन्वयिका म्हणून ज्ञानसागर इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पुणे येथील सहयोगी प्राध्यापिका डॉ. रचना शिखरे यांनी काम केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘अनिश्चिततेचे मार्गनिर्देश बदल अनुकूल करणे आणि गतिमान कार्य वातावरणात कर्मचाऱ्यांमध्ये लवचिकता वाढवणे’ या विषयावर कल्याणी ग्रुपचे मानव संसाधन श्री. अरुण फुलेरा, के.एस.बी. इंडियाचे उपाध्यक्ष-
मानव संसाधन श्री. मोहन पाटील, भारत फोर्जचे संचालक मानव संसाधन डॉ. संतोष भावे यांनी मार्गदर्शन केले.
‘उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करणारे सहकार्य वाढवणे’ या विषयावरील पॅनल चर्चा दोन मध्ये शिक्षणतज्ज्ञ म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. एस. महाजन, रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अधिष्ठाता डॉ. मनीषा संक्षेना आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून श्री. साईदास खानगाव व राजेंद्र ढाईनजे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनीता दलवाई यांनी केले तर सांगता आभार विलो माथेर आणि प्लॅट पंप्सचे वरिष्ठ
व्यवस्थापक श्री. संदीप सावंत मानले. सदर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये विविध कंपन्यांचे मानव संसाधन, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.