no images were found
डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजच्यावतीने. रविवारी ‘मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह’
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि सिरी एज्युटेक, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ एप्रिल रोजी फार्मसी विद्यार्थ्यांसाठी ‘मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये १० नामांकित कंपन्यांचा सहभाग असून फार्मसी मधील पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
या “मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह “ मध्ये विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार विविध परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये ॲप्टीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन समावेश आहे. यातुन उत्तम गुण प्राप्त करून निवड झालेले विद्यार्थी अंतिम फेरी म्हणजेच पर्सनल इंटरव्ह्यूला सामोरे जातील. डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजची स्थापना दोन वर्षापूर्वी झाली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सर्वांगीण विकास व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे. अन्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
२८ रोजी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कदमवाडी, कोल्हापूर ऑडिटोरीयम हॉल, सकाळी ८.३० वा. ते सायं. ५.३० या कालावधीत मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासठी विद्यार्थ्यांनी https://tinyurl.com/5h7sjskz या लिंकवर नोंदणी करावी असे आवाहन प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी केले आहे.