Home मनोरंजन ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये बापोदरावर सूड उगवण्यासाठी वस्तीतील रहिवासी योजना आखतात यावरून प्रार्थना पुष्पाला बोल लावते

‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये बापोदरावर सूड उगवण्यासाठी वस्तीतील रहिवासी योजना आखतात यावरून प्रार्थना पुष्पाला बोल लावते

5 second read
0
0
34

no images were found

 पुष्पा इम्पॉसिबलमध्ये बापोदरावर सूड उगवण्यासाठी वस्तीतील रहिवासी योजना आखतात यावरून प्रार्थना पुष्पाला बोल लावते

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ ही मालिका पुष्पा (करुणा पांडे) या एका अत्यंत चिवट आणि धडाडीच्या स्त्रीची कहाणी सादर करते. पुष्पा निरंतर आशावादी राहून आयुष्यातील आव्हानांना निडरतेने तोंड देणारी स्त्री आहे. अलीकडच्या भागांमध्ये, पुष्पाने पक्याला (रोहन जाधव) बापोदराला मारण्यापासून रोखले, तेव्हा चाळीत तणावाचे वातावरण निर्माण झालेले प्रेक्षकांनी पाहिले.

आगामी भागांमध्ये प्रेक्षक अनेक घडामोडी होताना पाहतील, कारण पक्याची वस्ती नष्ट करण्यात येते, आणि याबद्दल बापोदरा (जयेश बरभाया)ला दोषी मानून पक्या आपल्या वस्तीतल्या मित्रांसह बापोदरावर हल्ला करतो कारण बापोदराच्याच पक्षाने हा विनाश करण्याचे आदेश दिलेले असतात. ते बापोदराला खूप मारहाण करतात आणि शेवटी अनेक काळ्या-निळ्या जखमा झालेला बापोदरा मरणाशी झुंज देत दवाखान्यात दाखल झालेला दिसतो.

या रणधुमाळीत पुष्पा पक्याला सांगते की, ती त्याचा बापोदराबद्दलचा राग ती समजू शकते पण त्याने शांत राहिले पाहिजे. तो बापोदराला काही हानी करणार नाही, असे वचन ती त्याच्याकडून घेते. परंतु, पुष्पा पक्याशी बोलते, यावरून बापोदराची मुलगी प्रार्थना (इंद्राक्षी कांजीलाल) पुष्पाला बोल लावते आणि आपल्या वडीलांच्या ऐवजी पक्याला भावनिक आधार दिल्याबद्दल पुष्पाला दोष देते. त्यामुळे दोघींमध्ये बोलाचाली होते. तणाव वाढतो, नात्यांची कसोटी होते आणि नाट्य उलगडत जाते.

पुष्पाची भूमिका करत असलेली करुणा पांडे म्हणते, “पुष्पाची व्यक्तिरेखा अशीच आहे, जी सतत इतरांची काळजी करत असते. सगळ्यांची काळजी घेत असते. यावेळी सुद्धा ती पक्याकडून बंदूक काढून घेते पण जेव्हा ती सगळ्यांच्या देखत खाली पडते, तेव्हा गैरसमज निर्माण होतो. पुष्पाची पक्याला फूस आहे या समजामुळे पुष्पा आणि तिची सून प्रार्थना यांच्यात बोलाचाली होते. वास्तविक पुष्पाचा उद्देश बापोदराला वाचवण्याचाच असतो. पुष्पासाठी हा कठीण समय आहे, पण यातून ती नक्की बाहेर पडेल आणि सारे काही चांगले होईल याची खातरजमा करेल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्टार प्रवाह वाहिनीने हाती घेतला वृक्षारोपणचा उपक्रम…

स्टार प्रवाह वाहिनीने हाती घेतला वृक्षारोपणचा उपक्रम…     जागतिक पर्यावरण …