Home राजकीय पक्षांतर करताच अनेकांना मिळाला फायदा!

पक्षांतर करताच अनेकांना मिळाला फायदा!

4 second read
0
0
31

no images were found

पक्षांतर करताच अनेकांना मिळाला फायदा!

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांनी पक्षांतर केलय. तर काही जणांनी घरवापसी केली आहे. दरम्यान, पक्षांतर करताच अनेकांना फळ मिळालय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयात केलेल्या दोघांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय. तर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटातून दोन नेत्यांची घरवापसी करुन घेतलीये. तर धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शरद पवारांनी 3 आयात केलेल्या नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काँग्रेस आमदाराला आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आयात नेत्यांची चांदी झालीये. जाणून घेऊयात कोणा कोणाला उमेदवारी मिळालीये.
अर्चना पाटील भाजपमध्ये होत्या. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अजित पवार यांनी अर्चना पाटलांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. अर्चना पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर मैदानात आहेत.
शिवाजी आढळराव पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होते. त्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजित पवारांनी आढळराव पाटलांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिंदे यांनी लागलीच रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर केली. राजू पारवेंची लढत कॉंग्रेसच्या श्याम बर्वे यांच्याशी असणार आहे.पाचोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार भाजपमध्ये होते. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याची लढत भाजपच्या स्मिता वाघ यांच्याशी असणार आहे.
बजरंग सोनवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवले आहे.
आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत लंके शरद पवारांच्या गटात दाखल झाले. शरद पवारांनी लंकेंना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. लंकेंचा सामना भाजपच्या सुजय विखे यांच्याशी असणार आहे.
गेल्या 5 वर्षापासून राजकारणापासून अंतर ठेवून असलेले सोलापुरातील मोहिते पाटील घराणे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत रविवारी (दि.15) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर धैर्यशील मोहिते माढा लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्यासमोर भाजपचे रणजित निंबाळकर यांचे तगडे आव्हान आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …