no images were found
अखेर प्रकाश आवाडेंची माघार, शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा !
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केलेल्या इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी माघार घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पाठिंबा जाहीर केला
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी इचलकरंजी आमदार आवाडे यांनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली. त्यामुळे महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मत विभागणीचा धोका निर्माण झाला होता. आवाडे यांनी माघार घ्यावी म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी त्यांची भेट घेतली होती .मात्र आवाडे हे निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. सोमवारी महायुतीचे उमेदवार प्रा संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या अर्ज दाखल करतेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले त्यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई, शिवसेनेचे नेते रामदास कदम, विजय शिवतारे, जनसुराज शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे हे होते. आवाडे यांच्या निवासस्थानी त्यांच्यासोबत चर्चा झाली. जवळपास तासाभराच्या चर्चा नंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद आवाडे यांनी लोकसभा निवडणूक माघार घ्यायची तयारी दर्शवली. तसे त्यांनी नेत्यांना शब्द दिला. लोकसभा निवडणुकीतून माघार घेत विद्यमान खासदार माने यांना पाठिंबा देत असल्याचेही आमदार आवाडे यांनी घोषित केले. त्यामुळे महायुतीतील पेच सुटला आहे तसेच धैर्यशील माने यांनाही मोठा दिलासा मिळाला.