
no images were found
शिवाजी विद्यापीठात सेट व नेटबाबत दोनदिवसीय कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर, ( प्रतिनिधी ) :- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील शिक्षणशास्त्र अधिविभाग आणि सेंट्रल प्लेसमेंट सेेल यांच्या संयुक्त विद्यमाने ”सेट/नेट परीक्षेला सामोरे जाताना व उच्च शिक्षणातील संधी” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. सदर कार्यशाळे मध्ये नेट/सेट व परिक्षेमधील अभ्यास क्रमांतर्गत येणा-या सर्व दहा घटकांवर आधारित विविध विषयांवर अधिविभाग प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे तसेच डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. गजानन राशीनकर, डॉ. राजन पडवळ, डॉ. रूपाली संकपाळ, डॉ. कृष्णा पाटील, डॉ. शशिकांत शिंदे, डॉ. आसावरी जाधव, गंगाराम पवार इ. विषय तज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन पर व्याख्याने घेतली.
कार्यशाळेचे उद्धाटन अधिविभाग प्रमुख डॉ. सोनकांबळे, समन्वयक डॉ. पडवळ, डॉ. विद्यानंद खंडागळे शिक्षणशास्त्र अधिविभागातील शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी डॉ. सोनकांबळे यांनी सेट/नेट परीक्षेचे महत्व व त्यास सामोरे जाताना घ्यावयाची दक्षता याविषयी संबोधित केले. कार्यशाळेला शिवाजी विद्यापीठातील विविध विभागातील तसेच विद्यापीठांतर्गत कार्यरत विविध महाविद्यालयातीत पदव्युत्तर शिक्षण घेणारे तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले 110 विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी आजीवन शिक्षण विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार प्रमुख पाहुणे होते.कार्यशाळेबाबत सहभागी विद्यार्थी कोमल गुरव व श्री. अजित कपाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्र संचलन स्मिता पाटील यांनी केले व नेहा लाटे यांनी आभार मानले.