
no images were found
रांगोळीचे सरपंच नारायण भोसले यांचे सरपंचपद अपात्र
रेंदाळ : लोकनियुक्त रांगोळीचे सरपंच नारायण भोसले यांचे सरपंचपद अपात्र ठरविण्यात आले. अतिक्रमण केल्याच्या कारणावरून त्यांना अपात्र केल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
२०१७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भोसले हे पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाले होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी 13 सदस्यांनी त्यांच्यावर मनमानी कारभार करण्याचे कारण दर्शवून अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावेळी भोसले यांचे सरपंचपद अबाधित राहिले होते. त्यानंतर माजी ग्रा.पं. सदस्य बापूसो मुल्लाणी यांनी सरपंच भोसले यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून भूमिअभिलेख हातकणंगले यांनी मोजणी केली असता त्यामध्ये अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले असून कोणतेही म्हणणे व कागदपत्रे हजर न झाल्याने अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्याने सरपंच भोसले यांचे पद अपात्र ठरविण्यात आले.