no images were found
कै.विनायकराव क्षीरसागर यांना सर्वपक्षीय मान्यवरांकडून आदरांजली
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे वडील श्री.विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर वय ८८ वर्षे यांचे दि.२४.०३.२०२४ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. कै.विनायकराव क्षीरसागर यांना आदरांजली वाहण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक सभागृह येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून कै.विनायकराव क्षीरसागर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळी भरून निघणार नसल्याचे सांगत क्षीरसागर कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी असल्याचे सांगितले. यावेळी माजी महापौर अॅड.महादेव आडगुळे यांनी प्रमुख मनोगत व्यक्त केले. यासह खासदार श्री.धनंजय महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपचे महेश जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आदिल फरास, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आर.के.पोवार, अनिल घाटगे, आर.पी.आय.जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, हिंदू एकता आंदोलनचे गजानन तोडकर, मुस्लीम बोर्डिंगचे कादर मलबारी, नागरी कृती समितीचे अशोक पोवार, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, ख्रिश्चन समाजाचे राकेश सावंत, माजी नगरसेवक अशोक भंडारे, जुना बुधवार तालमीचे अध्यक्ष रणजीत शिंदे, श्री पांडुरंग सहकारी पतसंस्थेचे जहांगीर अत्तार, फिरोज उस्ताद, बेकरी असोसिएशनचे सत्यजित खाडे, अंकुश ग्रुपचे महेंद्र ओसवाल, रविंद्र सोहनी, नो मर्सी ग्रुपचे केदार शेळके, सनथ कोळेकर यांनी मनोगताद्वारे आदरांजली वाहिली. प्रास्ताविक शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी केले.
यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी गटनेते राहुल चव्हाण, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, माजी नगरसेवक राजू हुंबे, माजी नगरसेवक किरण नकाते, श्रीकांत पोतनीस, नंदू घोरपडे, राहुल चिक्कोडे, बाबा पार्टे, उदय भोसले, प्रसाद जाधव, रमेश मोरे, सुभाष चव्हाण, शंकरराव शेळके, पद्माकर कापसे, इब्राहीम मुल्ला, प्रशांत कासार आदी मान्यवर उपस्थित होते.