Home शैक्षणिक ग्रामीण अभ्यासक्रमात करिअरच्या विविध संधी

ग्रामीण अभ्यासक्रमात करिअरच्या विविध संधी

3 second read
0
0
32

no images were found

ग्रामीण अभ्यासक्रमात करिअरच्या विविध संधी

कोल्हापूर (प्रतिनिधी):  आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सर्वांगीण व शाश्वत विकासामध्ये ग्रामीण विकासाचे महत्त्व आणि त्यापुढील आव्हाने वाढत आहेत. परिणामी ग्रामीण विकास हे अभ्यासाचे क्षेत्र एक बहुविद्याशाखीय क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. जागतिक स्तरावरील ‘शाश्वत विकास उद्दिष्ट्ये’ मधील बहुतांश उद्दिष्ट्ये व ध्येय ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कृषी आणि ग्रामीण विकासशी निगडीत असल्यामुळे ग्रामीण विकास साध्य करणे हे जगातील सर्व देशांना अनिवार्य बनले आहे. ग्रामीण विकास म्हणजे कृषी क्षेत्र, कृषी आधारित उद्योग, कृषी प्रक्रिया-मूल्यवर्धन आणि आनुषंगिक सेवा क्षेत्रांचा सर्वसमावेशक विकास आणि विस्तार करणे होय.

शिवाजी विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट अंतर्गत असणारा ‘मास्टर ऑफ रुरल स्टडीज’ (एम. आर. एस) हा एक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम हे जो ग्रामीण भागांच्या विकासाशी संबंधित क्षेत्रांच्या उद्दिष्ट प्राप्तीवर लक्ष केंद्रीत करतो. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची संरचना तयार केली आहे. त्यासाठी अभ्यासक्रमामध्ये उद्योजकता, कृषी, कृषी-प्रक्रिया, ग्रामीण उद्योग, उद्योजकता विकास, अर्थशास्त्र, सांख्यिकी, नैसर्गिक सांसाधने, पर्यावरण, विपणन, वित्त, सामाजिक सुधारणा, मानवी संसाधन विकास, नवोपक्रम व स्टार्टअप, समुदाय विकास, ग्रामीण विकास कार्यक्रम व योजना, सहकार, माहिती-तंत्रज्ञान, अंतरराष्ट्रीय व्यापार, पर्यटन, व्यक्तिमत्व विकास व कौशल्य आदि घटकांचा समावेश केलाआहे.

शिवाय या अभ्यासक्रमामध्ये ग्रामीण विकासाच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करणारे बहुविद्याशाखीय ज्ञान आणि कौशल्ये समाविष्ट केली आहेत. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ग्रामीण विकासाची वास्तविकता अनुभवण्यासाठी इंटर्नशीप, क्षेत्र अभ्यास आणि प्रकल्प अहवाल यासारख्या साधनांचा वापर केला जातो. ग्रामीण अभ्यासक्रम हा ग्रामीण भागातील सर्व घटकांच्या विकासाशी संबंधित क्षेत्रात रोजगार व स्वयं रोजगाराच्या अनेक सुलभ संधी उपलब्ध करून देतो. सुशिक्षित
तरुणांनी स्थानिक भागात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनाचा वापर लघु आणि मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाते. अभ्यासक्रमातील असलेले घटक, प्रकल्प, अंतर्गत प्रशिक्षण कौशल्य आणि संशोधन प्रबंध यामुळे युवा उद्योजक निर्मितीसाठी सकारात्मक प्रोत्साहन मिळते. स्वयंरोजगारशिवाय ग्रामीण भागातील विविध समस्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी संशोधनाचा अवलंब केला जातो. यामुळे सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी आवश्यक धोरण निर्मिती व अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांना चालना मिळते. ग्रामीण विकासासाठी तरुणांनी शासकीय पातळीवरून आपले योगदान देण्यासाठी मास्टर ऑफ रुरल स्टडीज या अभ्यासक्रमाची रचना ही स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर करण्यात आली आहे. केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग यांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा, सरळ सेवा भरती आणि बँकिंग संदर्भातील परीक्षा यांचा अभ्यासक्रम आणि मास्टर ऑफ रुरल स्टडीजचा अभ्यासक्रम हा एकमेकांना पूरक आहे.

यामुळे विद्यार्थ्यंना रुरल स्टडीज अभ्यासक्रमातून आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय पातळीवर करिअर करता येते. आधुनिक व स्पर्धात्मक युगामध्ये शाश्वत विकासासाठी व पौष्टिक आहारासाठी ‘कृषी व ग्रामीण क्षेत्र’ हेच मूलभूत अंग राहणार आहे. मास्टर ऑफ रुरल स्टडीज हा ग्रामीण विकासाच्या सर्व घटकांना समाविष्ट करून चिरंतन विकासासाठी कार्यरत असणारा आणि विद्यार्थ्या-तरुणांना रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा एक महत्वाचा अभ्यासक्रम आहे. कोणत्याही विषयातील पदवीधारक वा पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्या मास्टर ऑफ रुरल स्टडीज अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संकेत स्थळावरील ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरून प्रवेश घ्यावा, असे आवाहन एम.आर.एस. अभ्यासक्रम समन्वयिका डॉ. कविता वड्राळे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…