no images were found
‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जल अभ्यासक डॉ.सुमंत पांडे यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात‘ ‘पाण्याचे नियोजन आणि महत्व‘ या विषयावर जल साक्षरता केंद्र, यशदा, पुणे, येथील माजी कार्यकारी संचालक तथा ‘चला जाणूया नदीला‘ च्या राज्यस्तरीय समितीतील अशासकीय सदस्य, जल अभ्यासक डॉ.सुमंत पांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
पाणी ही एक नैसर्गिक संपत्ती आहे जी आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक आहे. आपण दैनंदिन कामांसाठी जे पाणी वापरतो त्यातील बहुतांश पाणी भूजलातून येते. आपल्याकडे स्थिर आणि निरोगी जीवनशैलीसाठी नैसर्गिक संसाधने खूप महत्वाची भूमिका बजावतात. चांगल्या आरोग्यासाठी गोड्या पाण्याचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे भूजलाचा वापर वाढत असून पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. यामुळे सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता पडू नये, तसेच भूजल संवर्धनासाठी जगभरात दरवर्षी 22 मार्च रोजी ‘जागतिक जल दिन‘ म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य लक्षात घेता ‘पाण्याचे नियोजन आणि महत्व‘ या विषयावर जल अभ्यासक डॉ. पांडे यांनी ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
‘दिलखुलास‘ कार्यक्रमात डॉ. पांडे यांची मुलाखत बुधवार दि. 27, गुरुवार दि. 28, शुक्रवार दि. 29 आणि शनिवार दि.30 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 29 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.