no images were found
फार्मसी उद्योग सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र -सचिन कुंभोजे
कोल्हापूर (प्रतिनिधी): भारतातील आरोग्य सेवा उद्योग वेगाने वाढत असून औषध निर्माण अर्थात फार्मसी क्षेत्राची व्याप्ती प्रचंड वेगाने विस्तारत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अगणित संधी असल्याचे प्रतिपादन इंटरनॅशनल स्पीकर सचिन कुंभोजे यानी केले.
डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे दोन दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेमध्ये 10 कॉलेजमधून द्वितीय वर्ष डी फार्मसीचे 200 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. भारत हा फार्मास्युटिकल्सचा प्रमुख निर्यातदार आहे, 200 हून अधिक देशांमध्ये निर्यातीद्वारे सेवा दिली जाते. आज संपूर्ण जगामध्ये फार्मासिस्ट हा आरोग्य संपदेच्या व्यवसायामध्ये 3 री महान शक्ती म्हणून उदयास आला आहे.
कुंभोजे म्हणाले, आज आपल्या देशात जवळपास 15 लाख फार्मासिस्ट विविध विभागामध्ये कार्यरत आहेत. फार्मासिस्ट, औषध निरीक्षक, औषध तंत्रज्ञ, पॅथॉलॉजिकल लॅब सायंटिस्ट, आरोग्य निरीक्षक, उद्योजक यासह अनेक संधी या क्षेत्रात आहेत.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल म्हणाले, मुलांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी त्यांचामधील अंगीभूत सुविधा व कलागुणाच्या विकास करणे गरजेचे आहे.
प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे म्हणाले, जन्मापासून ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आवश्यक घटकांपैकी सर्वात महत्वाचं घटक म्हणजे औषध होय.
आयआयएम टेडेक्स स्पीकर विश्वजीत काशीद यांनी भविष्यातील करिअरच्या विविध संधी, फार्मसी क्षेत्रातील नवनवीन शोध, एक संघ व एकजुटीने काम करण्याची पद्धत, व्यक्तिमत्व विकास फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, संवाद कौशल्य मुलाखतीसाठी तयारी आणि अशा विविध गोष्टींवरती मार्गदर्शन केले.
आर.जे. मनीष व डॉ. ऋषिकेश पोळ यांनी व्यक्तिमत्व विकास आणि ध्येयपुर्तीसाठी प्रयत्न यासंबंधी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व नियोजन प्रा. डॉ. केतकी धने यांनी केल. सूत्रसंचालन प्रा. मुस्कान सिंग यांनी तर आभार प्रा. जयकेदार पोर्लेकर यानी मानले. प्रा. समृद्धी पाटील, प्रा.स्नेहल कोरफळे,सौ स्नेहल कुलकर्णी,वैष्णवी मंगरूळे यांनी परिश्रम घेतले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.