no images were found
नागपुरात भाजपाविरूद्ध लढणार ?, भाजप-मनसे युतीची चर्चा फिस्कटली
नागपूर : सध्या राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याची सुरूवात भाजपचा बालेकिल्ला नागपूरमधून झाली आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि मनसेच्या युतीबद्दल मोठं विधान केले आहे. मात्र, त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यावेळी त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन वादावरून हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, हा विदर्भ सर्वात पहिले काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, आज जर हा भाजपाचा बालेकिल्ला झाला असेल तर, तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेल्या संघर्षातून त्यांच्या हाती आला आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहूनच अनेक पक्ष मोठे होतात. प्रत्येक ठिकाणी अनेकांना प्रस्थापितांच्या विरोधातच उभं राहावं लागतं. त्यामुळे जर नागपूरात जर भाजप प्रस्थापित असतील तर, त्यांच्या विरोधातच लढावं लागेल असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तर, गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपममध्ये युती होणार अशी जी चर्चा सुरू होती ती फिस्कटली का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.
यावेळी नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. तसेच घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राज ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉनवादावरून मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच ही चर्चा नेमकी कुठं फिस्ककटी हे सत्य बाहेर येण्यासाठी या सर्व प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का? याचीही चौकशी व्हावी