Home मनोरंजन गीतांजली मिश्रा यांनी गरीबांना मदत करण्‍यासाठी आपली १० वर्षांची बचत केली दान

गीतांजली मिश्रा यांनी गरीबांना मदत करण्‍यासाठी आपली १० वर्षांची बचत केली दान

2 min read
0
0
30

no images were found

गीतांजली मिश्रा यांनी गरीबांना मदत करण्‍यासाठी आपली १० वर्षांची बचत केली दान

वैयक्तिक प्रयत्‍न, तसेच वैयक्तिक महत्त्वाकांक्षांना प्राधान्‍य दिले जात असल्‍याच्‍या युगामध्‍ये सध्‍या एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मध्‍ये राजेशची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा नि:स्‍वार्थीपणाच्‍या आदर्श उदाहरण ठरल्‍या आहेत. साध्या राहणीमानाच्या पार्श्‍वभूमीमधून आलेल्‍या गीतांजली मिश्रा यांनी अभिनेत्री म्‍हणून यश संपादित करण्‍यासह आपल्‍या समृद्धतेचा उपयोग थोर कार्यासाठी करण्‍याचे देखील ठरवले आहे. त्‍यांनी गरजू व्‍यक्‍तींना मदतीचा हात म्‍हणून आपली दहा वर्षांची बचत दान केली आहे.

सामाजिक जबाबदारीप्रती आपल्‍या समर्पिततेबाबत सांगताना गीतांजली मिश्रा म्हणाल्‍या, ”माझा दृढ विश्‍वास आहे की, समाजाच्‍या कल्‍याणाप्रती योगदान देण्‍याचे कार्य सर्वोत्तम आहे. समाजाप्रती जबाबदार असल्‍याने मला वैयक्तिक प्रेरणा मिळाली आहे, तसेच समुदायाच्‍या भल्‍यासाठी मी करत असलेल्‍या कार्यांमधून सकारात्‍मक बदल देखील घडून येत आहे. कोविड काळामध्‍ये माझ्या घरातील मोलकरीण मदतीसाठी माझ्याकडे आली, तिने दैनंदिन गरजा भागवण्‍यासाठी सामना कराव्‍या लागणाऱ्या संघर्षाबाबत सांगितले. ज्‍यानंतर मी पुढील काही महिने तिला आवश्‍यक वस्‍तूंचा पुरवठा केला, म्‍हणतात ना ‘परोपकारी कार्य स्वत:पासूनच सुरू होते’. तिच्‍याकडून मला तिच्‍या समुदायामधील अनेक कुटुंबांना दररोज सामना कराव्‍या लागणाऱ्या आव्‍हानांबाबत समजले. हे समजल्‍यानंतर मी या कुटुंबांना रेशन किट्सचा पुरवठा केला, ज्‍यामध्‍ये तांदूळ, डाळ, कडधान्‍य, मीठ, साखर व बिस्किटांसह स्‍वच्‍छताविषयक वस्‍तू जसे साबण, सॅनिटायझर्स, मास्‍क्‍स अशा वस्‍तूंचा समावेश होता. मी प्रत्‍येकाच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी सर्व सुरक्षितता प्रोटोकॉल्‍स व नियमांचे पालन केले. आव्‍हानात्‍मक स्थिती असताना देखील मी कोणतेही स्‍थळ असो गरजूंना माझ्यापरीने मदत करण्‍याचा निर्धार केला होता. तो अत्‍यंत आव्‍हानात्‍मक काळ होता, पण व्‍यक्‍तींच्‍या जीवनात सकारात्‍मक प्रभाव निर्माण करण्‍याच्‍या मिळालेल्‍या संधीने मला अधिक प्रेरित केले.” त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, ”मी आर्थिक साह्य करण्‍याऐवजी लोकांच्‍या आवश्‍यक गरजांची पूर्तता करण्‍याला प्राधान्‍य दिले. विविध स्थितींमध्‍ये मी विविध ऑनलाइन व्‍यासपीठांसोबत सहयोग करत रेशन किट्स वितरित केले, ज्‍यासाठी मी दशकापासून बचत केलेले जवळपास २५ लाख रूपये दान केले. या परोपकारी कार्याच्‍या प्रवासादरम्‍यान मी नेहमी लक्षात ठेवले की ‘जमीन पे रहके कमाया है, आज लोगो की जरूरत है, पैसे वापस जमा कर लेंगे और उपरवाले के सीसीटीव्‍ही में सब कॅप्‍चर होता है’. या भावनेने मला अधिक प्रेरित केले, मी आर्थिक साह्य प्रदान करण्‍याऐवजी त्‍वरित आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍यासाठी माझे योगदान दिले.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…