Home मनोरंजन सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये धक्कादायक कलाटणी : डॉक्टरांनी पुष्पाला मृत घोषित केले!

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये धक्कादायक कलाटणी : डॉक्टरांनी पुष्पाला मृत घोषित केले!

2 second read
0
0
19

no images were found

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये धक्कादायक कलाटणी : डॉक्टरांनी पुष्पाला मृत घोषित केले!

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ ही मालिका प्रेक्षकांना पुष्पाचा (करुणा पांडेय) हृदयस्पर्शी प्रवास उलगडून सांगते. पुष्पाची व्यक्तीरेखा धीरोदात्त असून ती अतूट भावनेने आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करते. यातून प्रेक्षक तिच्या व्यक्तिरेखेशी आपली नाळही जोडतात. मालिकेत अलीकडे आलेल्या नाट्यमय कलाटणीनुसार गोळी मारल्यानंतर पुष्पा जीवन-मृत्यूच्या परिस्थितीत अडकली आहे. मालिकेचे कथानक जसजसे उलगडत जाते- पुष्पाचे कुटुंबाला हृदय भंगाचा सामना करावा लागतो. डॉक्टर तिला लागलेली गोळी काढतात, मात्र पुढील 24 तास पुष्पासाठी अत्यंत कठीण असल्याचा इशाराही ते देतात.

मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना मोठा हादरा बसणार आहे. शॉक ट्रीटमेंट देऊनही पुष्पा प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टर तिच्या कुटुंबाला कळवतात. मोठ्या जड अंतकरणाने नर्सला पुष्पाचा ऑक्सिजन मास्क काढायला सांगत तिचे निधन झाल्याची अधिकृत घोषणा करतात. यामुळे प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसतो. पुष्पाच्या भवितव्याबद्दल पुढे काय होणार, याची खात्री मिळत नसल्याने पडद्यावरील आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेला आता एखादा चमत्कारच वाचवू शकतो, याची त्यांना आशा लागते.

मालिकेत पुष्पाची भूमिका साकारणारी अभिनेत्री करुणा पांडेय म्हणाली की, नुकतेच पुष्पाला गोळी मारण्यात आली असून तिचे आयुष्य धोक्यात सापडले आहे. तिचे आयुष्य किती क्षणभंगूर आहे, याची चिंता तिच्या कुटुंबाला लागते. डॉक्टर पुष्पाला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असताना कथेला दु:खाची एक किनार लागते. पुष्पाच्या मजबूत भावनेला ही कठीण आव्हानांचा सामना करावा लागतोय, हे प्रेक्षकांसाठी खूप धक्कादायक आहे. पुढे काय होईल, याची आम्हाला खात्री नाही. पुष्पासाठी काहीतरी चमत्कारच व्हावा, अशी आशा प्रत्येकाला लागली आहे. माझ्यासाठी गोळीबाराचा सीन खूप भावनिक दृष्ट्या खूप आव्हानात्मक आणि तितकाच रोचक होता.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…