
no images were found
शुभांगी अत्रे यांनी अंगूरीच्या एआय व्हर्जनबाबत दिली प्रतिक्रिया!
रोबोटिक्स आणि एआयचे प्रगत क्षेत्र विश्वामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहेत, भविष्याबाबत झलक दाखवत आहेत, जेथे आपल्या सभोवतालचे वातावरण मशिन्ससह गुंतलेले असणार आहे. एआय ट्रेण्डच्या वाढत्या लोकप्रियतेशी बांधील राहत एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या अलिकडील एपिसोडने प्रेक्षकांना अचंबित केले, जेथे शुभांगी अत्रे साकारत असलेली भूमिका लाडक्या अंगूरी भाबीचा एआय अवतार पाहायला मिळाला. या एपिसोडमध्ये अंगूरीसारखी हुबेहूब दिसणारी रोबोटिक सोबती तिला साह्य करण्यासाठी आली आहे, पण तिला सळो की पळो करून सोडते, ज्यामुळे विनोदी गोंधळ निर्माण होतो.
अंगूरी भाबीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे म्हणाल्या, ”दर आठवड्याला आम्ही प्रेक्षकांना नवीन, लक्षवेधक व मनोरंजनपूर्ण कन्टेन्टचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो. लेखक व क्रिएटिव्ह्जच्या आमच्या समर्पित टीमने कथानकामध्ये विनोदाची भर करत प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करण्यासाठी अथक मेहनत घेतली. आमच्या मालिकेच्या अलिकडील एपिसोडमध्ये विद्यमान एआय ट्रेण्डशी निगडित एआय-संचालित कथानक सादर करण्यात आले. या एपिसोडमध्ये अंगूरी रोबोट बनते. असे घडते की अधिक कामांचा भार असलेल्या अंगूरीला सक्सेना (सानंद वर्मा) तिच्यासारखा दिसणारा एआय रोबोट देतो. या रोबोला कोणतेही द्रवपदार्थ चालत नाहीत याबाबत माहित नसल्याने ती नकळतपणे राबोटला पाणी प्यायला देते. यामुळे बिघाड झालेली रोबोट विभुतीचा (आसिफ शेख) अपमान करते आणि तिवारीशी (रोहिताश्व गौड) गैरवर्तणूक करते, यामुळे गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण होते. मला एआय ह्युमनॉईड भूमिका अंगूरी रोबोबाबत समजले तेव्हा मी मस्करीत प्रश्न केला की, ‘रोबोट’ चित्रपटात दिग्गज रजनीकांत यांनी साकारलेल्या ‘चिट्टी’ सारखीच असेल का? (हसतात). या एपिसोडसाठी शूटिंग करताना खूप धमाल आली आणि तो उत्साहवर्धक अनुभव होता. मी या खास एपिसोड्सच्या निर्मितीसाठी मालिकेच्या लेखकांचे कौतुक करतात, यामुळे आम्हा कलाकारांना आव्हान मिळण्यासह काहीतरी वेगळे साकारण्याची संधी मिळते. गेल्या सात वर्षांमध्ये अंगूरी भूमिकेची विभिन्न पात्रं साकारली असताना देखील एआय रोबोट साकारण्याचा अनुभव उत्साहवर्धक होता. अंगूरीची भूमिका साकारणे सोपे आहे, पण तिचे रोबोटिक व्हर्जन साकारणे आव्हानात्मक होते. मला दोन्ही पात्रांमध्ये संतुलन राखावे लागले, तसेच अधिक हालचाली न करता अंगूरीच्या विशिष्ट शैलीमध्ये घरगुती काम करण्याची खात्री घ्यावी लागली.” अभिनेत्री पुढे म्हणाल्या, ”या भूमिकेच्या माध्यमातून मला समजले की, एआय रोबोची भूमिका साकारताना शांतपणे रोबोटिक हालचाली कराव्या लागतात, ज्यामुळे प्रेक्षकांना हास्यपूर्ण मनोरंजनाचा आनंद मिळेल. कलाकार म्हणून मी सांगू शकते की, या भूमिकेचे बारकावे व भावना सुरेखरित्या सादर करण्यात आल्या. या ह्युमनॉईड भूमिकेमध्ये सामावल्यानंतर मला समजले की, आपल्या डीएनएचे अल्गोदिरम्स असो किंवा आपल्याला आकार देणारे सामाजिक कोड्स असो आपण प्रोग्रामिंगमध्ये गुंतून गेलो आहोत. माझ्या रोबोटिक संवाद व अभिनयासाठी माझे भरपूर कौतुक करण्यात आले, ज्यामधून मला असमकालीन भूमिका साकारण्यास प्रेरणा मिळाली आहे. मानवजातीची प्रगती पाहता माझा दृढ विश्वास आहे की, एआय तंत्रज्ञानाच्या पुढे जाण्यासह आपल्याला भविष्याबाबत झलक देखील दाखवत आहे. अल्गोरिदम्स व मशिन्स प्रगत होण्यासह एआय आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आमच्या मालिकेमधील अलिकडील एपिसोड कृत्रिम बुद्धिमत्ता आपले जीवन, काम आणि परस्परसंवादामध्ये कशाप्रकारे क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे याबाबत दाखवण्यात आले आहे, ज्यामधून भविष्याबाबत लक्षवेधक पुनरावलोकन मिळते.”