Home शासकीय शिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – मंत्री संजय बनसोडे

शिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – मंत्री संजय बनसोडे

6 second read
0
0
37

no images were found

शिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – मंत्री संजय बनसोडे

 

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील खेळाडूंच्या विकासासाठी शिरोळ येथे होणारे तालुका क्रीडा संकुल व जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू स्टेडियम दर्जेदार पद्धतीने तयार होणे आवश्यक आहे. याकरीता तालुका क्रीडा संकुलासाठी असणारी पाच कोटी रुपयांच्या निधीची मर्यादा वाढवून विशेष बाब म्हणून आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

 पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, यड्राव येथील रस्ते कामाचा शुभारंभ क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय पाटील- यड्रावकर, यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, उद्योजक एस. व्ही. कुलकर्णी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले, देशभरातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला लागणारी बहुतांश यंत्रसामग्री पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होते, ही गौरवास्पद बाब आहे. या औद्योगिक वसाहतीला सेवा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्याचे नमूद करुन श्री. बनसोडे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल महासत्तेकडे होत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. आमदार यड्रावकर हे अभ्यासू नेते असून या भागाच्या विकासासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटचे संचालक तथा उद्योजक अजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

 क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला क्रिकेटचा आनंद

जयसिंगपूर येथे नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू स्टेडियमला क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी येथील खेळाडूंसोबत क्रिकेटचा आनंद घेतला. खेळाडूंनी टाकलेल्या गोलंदाजीवर त्यांनी उत्तम फलंदाजी तर केलीच शिवाय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे फलंदाजी करीत असताना यष्टीरक्षणही केले. क्रीडा क्षेत्रात उत्तम करिअर आहे. शिरोळ तालुक्यातील खेळाडूंनी जिद्द, परिश्रम व सरावात सातत्य ठेवून सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांच्याप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवावे, अशा सदिच्छा त्यांनी या खेळाडूंना दिल्या.

 जयसिंगपूर विस्तारीत बसस्थानकाचे भूमिपूजन

   क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते जयसिंगपूर येथील विस्तारीत बसस्थानकाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी श्री बनसोडे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, संजय पाटील- यड्रावकर, राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, यंत्रअभियंता यशवंत कानतोडे, विभागीय अभियंता मनोज लिंग्रस व आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…