no images were found
नंगीवली चौक ते कोळेकर तिकटी रस्ता वाहतूकीस 15 दिवस बंद
कोल्हापूर : महापालिकेच्या रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत रस्ता करणेचे काम सुरु करण्यात आले असलेने नंगीवली चौक ते कोळेकर तिकटी हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. या रस्त्याचे काम आज गुरुवार, दि.25 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024 अखेर करण्यात येणार असल्याने साधारणत: 15 दिवस हे काम सुरू रहाणार आहे. तरी या रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक शहर वाहतूक शाखेच्या मार्गदर्शना खाली खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. हि वाहतुक नंगीवली चौक, पाण्याचा खजिना ते लाड चौक ते बिनखांबी चौक ते मिरजकर तिकटी या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तरी नागरीकांनी वाहतुकीसाठी या पर्यायी मार्गाचा वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.