no images were found
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा द. कोरियातील विद्यापीठाशी सामंजस्य करार
कोल्हापूर (प्रतिनिधी): डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि संगुकक्वान विद्यापीठ, दक्षिण कोरीया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व प्राध्यापकांना शैक्षणिक व संशोधनात्मक संधी उपलब्ध होणार आहेत.
संगुकक्वान विद्यापीठ हे दक्षिण कोरीयातील प्रतिष्ठित व संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे. या विद्यापीठाचा जगातील प्रमुख विद्यापीठांच्या यादीमध्ये समावेश होतो. पुढील पाच वर्षाकरिता हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत विद्यार्थी आणि प्राध्यापक विनिमय कार्यक्रम तसेच संशोधन क्षेत्रातील ज्ञानाची देवाण घेवाण होणार आहे. या सामंजस्य करारामुळे डी. वाय. पाटील आभिमत विद्यपीठातील विद्यार्थ्यांना दक्षिण कोरीया येथे संशोधनाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच संशोधन क्षेत्रातील आधुनिक विषयातील माहितीचे अदान प्रदान होण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे.
हा सामंजस्य करार होण्यासाठी द. कोरियातून प्रा. जी मान किम (सायन्स डीन), डॉ. रविंद्र बुलाखे आणि डी. वाय. पाटील विद्यापीठातुन डीन व रिसर्च डियरेक्टर डॉ. प्रा. सी. डी. लोखंडे, डॉ. उमाकांत पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या वतीने कुलगुरु डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी स्वाक्षरी केली तर सुंगक्युंकवान विद्यापीठचे प्रतिनिधीत्व वरिष्ठ संशोधक डॉ. रविंद्र बुलाखे यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले उपस्थित होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.