Home शैक्षणिक हीरकमहोत्सवी दीक्षान्त समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ सज्ज

हीरकमहोत्सवी दीक्षान्त समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ सज्ज

3 second read
0
0
26

no images were found

हीरकमहोत्सवी दीक्षान्त समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ सज्ज

 

कोल्हापूर(प्रतिनिधी)  : हीरकमहोत्सवी अर्थात ६० व्या दीक्षान्त समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ जय्यत तयारीनिशी सज्ज झाले आहे.

विद्यापीठाचा ६० वा दीक्षान्त समारंभ दि. १८ सकाळी ११.३० वाजता राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात होत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (ए.आय.सी.टी.ई.) या राष्ट्रीय नियामक संस्थेचे माजी चेअरमन डॉ. एस.एस. मंथा उपस्थित राहणार आहेत. या समारंभात राष्ट्रपती सुवर्णपदक विजेती साईसिमरन हिदायत घाशी आणि कुलपती सुवर्णपदक विजेती बिल्कीस हिदायत गवंडी यांच्यासह निवडक पुरस्कार व पीएचडी पदवीधारक स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके तथा पदवी प्रदान करण्यात येतील. या दीक्षान्त समारंभात एकूण ४९,४३८ इतकी पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या २७,४७५ इतकी लक्षणीय आहे.

दीक्षान्त मिरवणुकीसाठी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहापासून मुख्य इमारतीपर्यंत भव्य स्वागतकमान उभारण्यात आली आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्रे स्वीकारणाऱ्या स्नातकांना पदवी वितरणासाठी परीक्षा भवन क्रमांक २ च्या प्रांगणात मंडप घालून ३३ बूथ उभारण्यात आले आहेत. त्या प्रत्येक बूथवर ३०० पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येईल. नोंदणीकृत स्नातकांना त्यांच्या पदवीच्या बूथविषयीची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात आली आहे. त्याखेरीज विद्यापीठ परिसरात सहा ठिकाणी क्यूआर कोडचीही व्यवस्था केली. ते स्कॅन करून स्नातकाने त्याचा मोबाईल क्रमांक अथवा पीआरएन क्रमांक टाकल्यानंतर त्याला त्याचा दीक्षान्त क्रमांक तसेच बूथ क्रमांकही समजणार आहे.  

दरम्यान, आज सायंकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह समारंभस्थळी जाऊन सर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित अधिकारी, समितीप्रमुखांना कार्यक्रम सुनियोजितरित्या पार पडण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या वतीनेही सकाळी संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी करण्यात आली. दुपारपासूनच समारंभस्थळासह विद्यापीठ परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

समारंभास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या स्नातकांसह सर्वांनी सुमारे एक तास आधी स्थानापन्न व्हावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…