no images were found
41 कामगारांसाठी देवदूत बनला ‘अर्नोल्ड डिक्स’
उत्तरकाशी बोगदा बचाव अभियाना अनेक परदेशी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. यातीलच एक नाव अर्नोल्ड डिक्स यांचं आहे. सिल्क्यरा बोगद्यातून सर्व 41 कामगारांची यशस्वी सुटका केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, “ही सेवा करणे हा माझा सन्मान आहे आणि एक पालक म्हणून, सर्व पालकांना त्यांच्या मुलांना घरी पोहोचवण्यास मदत करणे हा माझा सन्मान आहे. मी सुरुवातीला म्हणालो की, 41 लोक सुखरुप आहेत आणि ख्रिसमसमुळे कोणालाही दुखापत होणार नाही. ख्रिसमस लवकर येत आहे.”
हे बचाव अभियान कशाप्रकारे यशस्वी झालं या प्रश्नाचं उत्तर देताना अर्नोल्ड डिक्स यांनी सांगितलं की, “आम्ही शांत होतो आणि आम्हाला नक्की काय हवे आहे, हे आम्हाला ठाऊक होतं. आम्ही एक अद्भुत संघ म्हणून काम केलं. भारताकडे सर्वोत्तम अभियंते आहेत. भारतातील उत्तम इंजिनिअर्स, भारतीय लष्कर आणि प्रशासन सर्वांचं हे यश आहे. या यशस्वी मोहिमेचा भाग बनणे, हे माझं भाग्य आहे. मी मंदिरात जाणार आहे कारण, मी जे घडले त्याबद्दल देवाला धन्यवाद करण्याचं वचन दिलं होतं. तुमच्या लक्षात आले नसेल, तर आपण सर्वांना एक अद्भूत चमत्कार पाहिला आहे.”
अर्नोल्ड डिक्स यांनी या मोठ्या रेस्क्यू ऑपरेशननंतर पुन्हा एकदा बाबा बौख नाग देवतेसमोर नतमस्तक होत आभार मानले आहेत. अर्नोल्ड डिक्स भूमिगत बांधकामाचे आंतरराष्ट्रीय सल्लागार आहेत. सर्व भारतीयांप्रमाणे त्यांनीही मजुरांच्या सुटकेसाठी देवाकडे प्रार्थना केली होती सिल्क्यरा बोगद्याच्या बाहेर असलेल्या बाबा बोथ नाग देवतेसमोर त्यांनी हात जोडले होते. यानंतर त्यांनी यश मिळाल्यावर त्यांनी देवाचे आभार मानले आहेत.