no images were found
सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांनी सांगितला ‘त्या’ 17 दिवसातला अनुभव
उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण पाहिला मिळालं. गेल्या सतरा दिवसांपासून हे कामगार बोगद्यात अडकले होते. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या बचावपथकाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. कामगारांना चिन्यालीसौड इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंत दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पण या सतरा दिवसात कामगारांनी बोगद्यात काय केलं, त्यांचा दिनक्रम कसा होता, आंघोळ, शौचालयाची व्यवस्था कशी केली होती, एकमेकांना धीर देण्यासाठी काय केलं. असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.
12 नोव्हेंबरला 41 कामगार बोगद्यात काम करत होते, इतक्यात मोठाला आवाज झाला आणि ढिगारा कोसळला. कामगारांनी पळण्याचा प्रयत्न केला पण ढिगाऱ्यामुळे सर्व रस्तेच बंद झाले होते. आपण पूरते अडकल्याचा अंदाज आला होता असं चमरा ओराव यांनी सांगितलं. सुरुवातीला आपण फार काळ जीवंत राहाणार नाही अशी मनात भीतीचे ढग दाटले. सर्व कामगार देवाचा धावा करत होते. सर्वांना एकमेकांना धीर द्यायला सुरुवात केली. जवळपास 24 तास सर्वजण एकमेकांचे हात पकडून होते. पण जगण्याची इच्छा त्यांनी सोडली नाही. एव्हाना बाहेर कामगार अडकल्याची माहिती पसरली आणि कामगारांच्या बचावकार्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले 13 नोव्हेंबरला कामगारांना इलाचीयुक्त तांदूळ पुरवण्यात आले. जेव्हा पहिल्यांदा तांदूळ मिळाले तेव्हा विश्वास वाढला की आमचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. पण वेळ घालवणं आणखी कठिण होत होतं. आमच्याकडे मोबाईल फोन होते, त्यावर ल्यूडो खेळू लागलो. पण मोबाईलचं नेटवर्क नसल्याने बाहेर कोणाशी संपर्क होऊ शकत नव्हता. एकमेकांशी बोलत एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न आमम्ही करत होतो असं चमर ओराव यांनी सांगितंल. शौचालयासाठी बोगद्याच्या कोपऱ्यात एख खड्डा करण्यात आला होता असंही ओराव यांनी सांगितलं. ओराव यांना पुन्हा बोगद्याच्या कामावर परतणार का असं विचारण्यात आलं. यावर त्यांनी येणाऱ्या काळात याबाबत निर्णय घेऊन असं सांगितलं. बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांपैकी सर्वात जास्त 15 कामगार हे झारखंडचे होते.