Home सामाजिक एडिलवाईस टोकियो लाईफ ठरली रिस्क मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस करता गोल्डन पिकॉक ॲवॉर्ड २०२३ प्राप्त करणारी एकमेव विमा कंपनी

एडिलवाईस टोकियो लाईफ ठरली रिस्क मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस करता गोल्डन पिकॉक ॲवॉर्ड २०२३ प्राप्त करणारी एकमेव विमा कंपनी

0 second read
0
0
24

no images were found

एडिलवाईस टोकियो लाईफ ठरली रिस्क मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस करता गोल्डन पिकॉक ॲवॉर्ड २०२३ प्राप्त करणारी एकमेव विमा कंपनी

मुंबई– व्यवसायाच्या गुणवत्तेत सातत्य आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एडिलवाईस टोकियो लाईफ तर्फे नाविन्यपूर्ण अशा रिस्क मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसचा अवलंब सुरु केला आहे. यामध्ये संस्थेच्या सर्व घटकांमध्ये धोक्यांना ओळखून फसवणूक टाळण्याची संस्कृती अंगिकारण्याचा समावेश आहे.

एडिलवाईस टोकियो लाईफ इन्शुरन्स चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभ्रजीत मुखोपाध्याय यांनी सांगितले “ फसवूणकीच्या घटना या केवळ व्यवसायासाठीच नव्हे तर ग्राहकांसाठी सुध्दा घातक असतात. त्याचा परिणाम हो मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची किंमत, बोनस पे आऊट्स, दाव्याची पूर्तता आणि अशा अनेक गोष्टींवर होत असतो. एक संस्था म्हणून आम्ही फसवणूक प्रतिबंधक गोष्टीं साठी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहोत. मग ते ऑटोमेशन असो किंवा धोका ओळखण्याची संस्कृती असो आम्ही अनेक उपाय करुन कंपनीच्या फायद्या बरोबरच नाविन्यपूर्ण अशी विभागातील सर्वोत्कृष्ट उत्पादने आणि सेवा आमच्या ग्राहकांना देऊ केल्या आहेत.”

आर्थिक वर्ष २०२३ च्या शेवटा पर्यंत जीवनविमा प्रदात्या कंपनी ने दावे पूर्ण करण्याचा दर हा ९९.२० टक्के राहिला आहे, १३ महिन्यांचा सातत्याचा दर हा ७५ टक्के आणि एनपीएस (ग्राहक समाधान मोजण्याचे परिमाण) ५४ आहे. कंपनी ने विविध क्षेत्रासाठी विविध अशी नाविन्यपूर्ण ट्रेन्ड सेटिंग उत्पादने सुरु केली असून यांत एडिलवाईस टोकियो वेल्थ अल्टिमा, एडिलवाईस टोकियो लाईफ जिंदगी प्रोटेक्ट, एडिलवाईस टोकियो लाईफ-सेव्हिंग्ज प्लान आणि अशा अनेक उत्पादनांचा समावेश आहे.

कंपनी ने प्रथमच सर्टिफाईड रिस्क ॲसेसर (सीआरए) प्रोग्रामची सुरुवात फ्रंटलाईन विक्रेत्यांसाठी सुरु केला आहे. या प्रोग्राममुळे त्यांना त्यांची कौशल्ये वाढवून त्यांना धोका योग्य प्रकारे समजू शकतील, खोटे अंडररायटर होण्यापासून त्यांचा बचाव होऊ शकेल. या प्रक्रिये मध्ये मशीन लर्निंग मॉडेल्सचा वापर करुन ग्राहकांच्या विविध प्रवासातील फसवणूक ओळखून अगदी विमा जारी करण्यापासून ते दावा पूर्ण करण्यापर्यंत धोका टाळता येतो. या अंतर्गत गणितीय मॉडेल्सचा वापर करुन बाजारपेठेतील हुशारी वापरुन केसेसचा तपास करण्याबरोबरच केसेस सोडवता येतात.

या वर्षी जीवन विमा प्रदात्यांना त्यांच्या रिस्क मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस साठी गोल्डन पिकॉक ॲवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे. या फोरमला कॉर्पोरेट गव्हर्नन्स, सस्टेनेबिलिटी, ईएसजी आणि रिस्क मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस करता ३७० प्रतिसाद आले होते. यापैकी एडिलवाईस टोकियो लाईफ सह केवळ १० संस्थांना रिस्क मॅनेजमेंट साठी गोल्डन पिकॉक ॲवॉर्ड प्राप्त झाला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…