
no images were found
शिवाजी विद्यापीठाची SAIF- DST ही अत्यंत कार्यक्षम आणि प्रभावी सुविधा: कोरियाचे प्रा. ली यांचे गौरवोद्गार
कोल्हापूर (प्रतिनिधी): “इतकी अत्याधुनिक उपकरणे एकाच छताखाली सुव्यवस्थित ठेवणे इतके सोप्पे काम नाही. तरीही SAIF- CFC चे प्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे यांच्या नेतृत्वाखालील इथले स्वच्छ, टापटीप आणि उत्कृष्ट प्रशासकीय व्यवस्थापन पाहून आश्चर्य वाटले. आमचेही काही नमुने इथे विश्लेषणासाठी पाठवायला आवडेल.” अश्या शब्दांत दक्षिण कोरियातील डोंगगुक युनिव्हर्सिटीचे प्रा. जे-जून ली यांनी शिवाजी विद्यापीठातील SAIF- CFC केंद्राचे कौतुक केले. प्रा. जे-जून ली हे दक्षिण कोरियातील डोंगगुक विद्यापीठमध्ये ऊर्जा आणि साहित्य अभियांत्रिकी विभागचे प्राध्यापक आहेत. ते मीट द सायंटिस्ट या स्कूल ऑफ नॅनोसायन्स, शिवाजी विद्यापीठ आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळेस त्यांनी SAIF- CFC केंद्रालाही भेट दिली. त्यांचे शब्द SAIF- CFC केंद्राच्या सुव्यवस्थित नियोजनाचा पुरावा देण्यासाठी पुरेसे आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू मा. पी. एस. पाटील आणि कुलसचिव मा. व्ही. एन. शिंदे यांच्या संपूर्ण पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे प्रा. आर. जी. सोनकवडे यांच्या नेतृत्वाखाली SAIF- CFC केंद्र उत्कृष्ट सुवेधेमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. तसेच प्रा. ली यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सोबत सामंजस्य करार करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर प्रा. सोनकवडे आणि डॉ. हेमराज यादव यांच्यासोबत कॉलेबोरेशन करायला आवडेल असेही ते म्हणाले. प्रो. ली यांनी या SAIF DST केंद्राला भेट दिली त्या वेळी, स्कूल ऑफ नॅनोसायन्सचे रामानुज फेलो असलेले डॉ. हेमराज यादव, देखील त्यांच्यासोबत होते. संपूर्ण जगभरातील अनेक कॉलेबोरेशनसोबत हे केंद्र आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रा. सी. डी लोखंडे आणि डॉ. जयवंत गुंजकर यांनीही प्रा. जे-जून ली यांच्यासोबत दोन विद्यापीठांचे कॉलेबोरेशन असल्याचे व्यक्त केले.