
no images were found
एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन भावनिक संवाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना छातीत दुखू लागल्याने तातडीने त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळताच त्यांनी फोन फिरवून तातडीने आवश्यक ती व्यवस्था केली. आता एकनात खडसे यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करत जी मदत केली त्याबद्दल आभार मानले आहेत. माझ्या आयुष्याचं विमान लँड झालंच नसतं असं म्हणत खडसे यांनी मुख्यमंत्र्यांशी भावनिक संवाद साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने केली व्यवस्था
एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातल्या दरे गावाता होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकनाथ खडसेंसाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्याशी संपर्क केला होता. त्यानंतर तातडीने एअर अँब्युलन्सची व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याबाबत आता एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.