no images were found
कुणबी नोंदी शोधण्यासाठी चोख नियोजन करा – संजय तेली
कोल्हापूर : कुणबी नोंदी शोधण्यासाठी चोख नियोजन करा, त्याचबरोबरच तपासलेल्या अभिलेख्यांच्या नोंदी बाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला दररोज सादर करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केल्या.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी संपूर्ण राज्यभर मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातही स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात विविध विभागांनी करावयाच्या कामांच्या नियोजनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तेली यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी पुराभिलेखागार विभागाच्या सहायक संचालक दीपाली पाटील, तहसीलदार जयवंत पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तेली म्हणाले, कुणबी नोंदी तपासण्याचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करा. तसेच योग्य समन्वय ठेवून काम पूर्ण करा. कुणबी नोंदीच्या अभिलेख्यांचे तसेच मोडी, उर्दू लिपीतील अभिलेख्यांचे भाषांतर व डिजिटायजेशन करा.
अभिलेखांची तपासणी करताना अभिलेख्यांचे प्रकार, तपासणी करण्याच्या पानांची संख्या, नोंदीची संख्या, आढळलेल्या नोंदी, तपासलेल्या नोंदीची संख्या, कुणबी जातीच्या आढळलेल्या नोंदीची संख्या, आदी माहिती विहित नमुन्यात भरुन देण्याच्या सूचनाही श्री. तेली यांनी केल्या