
no images were found
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आज दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत शहाजी लॉ कॉलेज येथे कार्यक्रम घेण्यात आला यावेळी चला हसत आनंदाने जगू या विषयावर हास्य सम्राट संभाजी यादव यांचे व्याख्यान घेण्यात आले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन ही यावेळी करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. साळे यांनी केले, 1 आक्टोंबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे कविता वाचन, गीत गायन, नृत्याविष्कार, एकपात्री, नाटक असे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी चहा बिस्किटे व जेवणाची सोय करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ प्रवीण पाटील, अध्यक्ष फेस्कॉम दिलीप पेटकर, डॉ. मानसिंग राव जगताप पदाधिकारी, सचिव फेस्कॉम श्रीकांत आडिवरे, समाजकल्याण निरीक्षक चित्रा शेंडगे, तालुका समन्वयक व सर्व समतादूत उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांचे जीवन सुसह्य व सुखकर व्हावे त्यांची शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी जेष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब यांनी तर तालुका समन्वयक सुरेखा डवर यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.