no images were found
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शपथ
कोल्हापूर : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात ३१ ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील शिवाजी सभागृहात जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रीय एकता दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शपथ दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा प्रशासन अधिकारी नरेंद्र मुतकेकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, तहसीलदार जयवंत पाटील, तहसीलदार सुर्यकांत पाटील, तहसीलदार स्वप्निल पवार, तहसीलदार सरस्वती पाटील यांच्यासह इतर विभाग प्रमुख व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी समर्पित होणे तसेच देशवासियांमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी भरीव प्रयत्न करणे, देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व कार्यामुळे हे शक्य झाले, तसेच एकता टिकवण्यासाठी स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करेन याबाबत उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतली.
यावेळी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला व देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.