Home सामाजिक जागतिक अन्न दिनानिमित्त विद्यापीठाची ‘पाण्यासाठी चाला’ रॅली

जागतिक अन्न दिनानिमित्त विद्यापीठाची ‘पाण्यासाठी चाला’ रॅली

8 second read
0
0
24

no images were found

जागतिक अन्न दिनानिमित्त विद्यापीठाची ‘पाण्यासाठी चाला’ रॅली

 

कोल्हापूर ( प्रतिनीधी ): भावी पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन करण्याबरोबरच अन्नाची नासाडी रोखणे ही जबाबदारी आजच्या युवा पिढीवर आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागातर्फे आज जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने ‘वॉक फॉर वॉटर’ (पाण्यासाठी चाला) ही विशेष जनजागरण रॅली काढण्यात आली. तिच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू बोलत होते.

        यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठापासून राजारामपुरीतील माऊलीच्या पुतळ्यापर्यंत आणि परत अशी रॅली काढण्यात आली. यंदा ‘पाणी हे जीवन, पाणी हे भोजन’ असा विषय असल्याने त्या अनुषंगाने प्रबोधन करणारे फलक रॅलीत होते. पाणी वाचवा-जीवन वाचवा, पाणी वाचवा-पृथ्वी वाचवा असे पाणीबचतीचे संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले. ‘पाणी हे जीवन, पाणी हे भोजन’ याच विषयावर शिवाजी विद्यापीठ परिसर, माऊली पुतळा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केली.

       यावेळी रॅलीत कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह कुलसचिव डॉ. शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी.डी. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. इराण्णा उडचण, डॉ. अमोल कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. डॉ. अभिजीत गाताडे, हर्षवर्धन कांबळे आणि स्नेहल खांडेकर यांनी रॅलीचे यशस्वी संयोजन केले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …