
no images were found
आपण शेफाली शाहला ‘मालकिकीनजी’ का म्हणतो!-अमिताभ बच्चन
या सोमवारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 15 या ज्ञान आधारित रियालिटी गेम शोमध्ये अष्टपैलू अभिनेत्री शेफाली शाह आणि प्रसिद्ध समाज सेवक हरे राम पांडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हरे राम जी यांना त्यांचे निकटवर्ती प्रेमाने ‘बाबा’ म्हणून संबोधतात. हरे राम जी दुर्गा मातेचे भक्त आहेत. लहान मुलींचे पुनर्वसन करून त्यांना एक सुरक्षित भविष्य देण्यासाठी काम करणारी नारायणसेवा आश्रम नावाची एक स्वयंसेवी संस्था स्थापन करण्याचे आपले स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे.
कसलेली अभिनेत्री शेफाली शाह एक अशी अभिनेत्री आहे, जिने विविध प्रकारच्या भूमिका साकारून आपले एक खास स्थान निर्माण केले आहे. KBC च्या खेळात ती हरे राम जी यांच्या सोबत, त्यांना मदत करताना दिसेल. आमंत्रित पाहुण्यांशी गप्पागोष्टी करताना होस्ट अमिताभ बच्चन शेफाली शाहला प्रेमाने ‘मालकिनजी’ म्हणून संबोधताना दिसेल. या संबोधनाचा संदर्भ त्या दोघांनी एकत्र केलेल्या ‘व्यक्त: द रेस अगेन्स्ट टाइम’ या चित्रपटाशी आहे. त्याविषयी सांगताना बिग बींनी सांगितले की, शेफाली शाहचे पती दिग्दर्शक विपुल शाह त्यांच्याकडे या चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन आलेले असताना, चित्रपटाची पटकथा वाचून अमिताभ बच्चन यांनी तत्काळ या भूमिकेसाठी होकार दिला. या चित्रपटात शेफाली शाहने बिग बींच्या पत्नीची भूमिका केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगची आठवण काढत बिग बी म्हणाले, “शेफाली शाह, विपुल शाहची पत्नी आहे आणि पडद्यावर ती माझ्या पत्नीची भूमिका करत होती. पण या चित्रपटाच्या सेटवर ती अशी वावरायची की, घराची मालकीण कोण आहे हे लगेच लक्षात यायचे. तिची अभिनयावर तर पकड होतीच, पण गरज भासेल तिकडे ती दिग्दर्शनाच्या सूचना देखील देत असे. त्याच वेळी मला ही जाणवले की, ती ‘जबरदस्त’ आहे.”