Home सामाजिक भारतातील सर्वांत श्रीमंत सेल्फ मेड महिलेचा प्रवास

भारतातील सर्वांत श्रीमंत सेल्फ मेड महिलेचा प्रवास

0 second read
0
0
28

no images were found

भारतातील सर्वांत श्रीमंत सेल्फ मेड महिलेचा प्रवास

कोण म्हणतं स्त्रिया या फक्त घरातील चार भिंतींत अन्न शिजवण्यासाठी आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी बनल्या आहेत. तिनं मनात आणलं, तर ती घर आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी यशस्वीपणे मल्टीटास्किंग करू शकते. भारतातही अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे राधा वेम्बू. साधी साडी, कपाळावर टिकली आणि खांद्यावर पर्स अशा लूकमध्ये त्यांना पाहिल्यास कोणीही ही एखादी सर्वसाधारण महिला आहे, असं म्हणेल. मात्र, या महिलेची संपत्ती ३६ हजार कोटी रुपये आहे, असं सांगितल्यास तुमचा विश्वास बसेल? नाही ना! पण, हे खरं आहे. वरील फोटोत दिसणाऱ्या ५० वर्षीय राधा वेम्बू या सध्या भारतामधील श्रीमंत व्यक्तींमध्ये ४० व्या स्थानावर आहेत. चला तर, त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊ.
राधा यांचा जन्म १९७२ साली झाला. त्यांचे वडील मद्रास उच्च न्यायालयामध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करायचे. त्यांनी आयआयटी मद्रासमधून आपलं शिक्षण पूर्ण करीत इंडस्ट्रियल मॅनेजमेंटची पदवी घेतली. १९९६ साली राधा यांनी त्यांचे भाऊ श्रीधर वेम्बू व शेखर वेम्बू यांच्या मदतीने अॅडवेन्टनेट नावाने कंपनी सुरू केली. झोहो कॉर्प ही एक खासगी आयटी कंपनी असून, ती राधा आणि त्यांच्या भावांनी स्थापन केलेली आहे. या कंपनीमधील सर्वांत मोठा वाटा हा राधा यांच्या नावावर आहे.
या कंपन्यांमध्येही राधा डायरेक्टर!
राधा या जानकी हाय-टेक अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कृषीवर आधारित एनजीओमधील डायरेक्टरही आहेत. तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातील हायलॅण्ड व्हॅली कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्येही राधा या डायरेक्टर आहेत. राधा या विवाहित असून, त्यांना एक मुलगा आहे.
राधा वेम्बूची एकूण संपत्ती ३६ हजार कोटी रुपये असून, त्यांनी सर्वांत श्रीमंत सेल्फ मेड भारतीय महिलांमध्ये स्थान मिळवलं आहे. २२,५०० कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या ‘नायका’च्या फाल्गुनी नायर या ८६ व्या स्थानावर आहेत; तर राधा वेम्बू भारतातील १०० सर्वांत श्रीमंत लोकांमध्ये ४० व्या स्थानावर आहेत.
आयुष्यात काही मोठं करण्यासाठी तुमचं एक विशिष्ट वयच असणं आवश्यक आहे, असं वाटतं का? तुमचं वय झाल्यावर तुम्ही विशेष काही साध्य करू शकत नाही, असं तुम्हाला वाटतं का? जर तसं वाटत असेल, तर मग स्वबळावर अब्जाधीश बनलेल्या या महिलेकडून तुम्ही शिकायला हवं.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन   कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी …