
no images were found
60 रुपयांच्या लॉटरी तिकीटावर ‘तो’ झाला 1 कोटींचा मालक
‘उपरवाला जब भी देता हैं ; तो देता हैं छप्पर फाड के’, असं तुम्ही खूप वेळा ऐकलं असेलच. पश्चिम बंगालच्या (कोलकाता) पूर्व बर्धवान जिल्ह्यातल्या एका मजुराला हा ज्वलंत अनुभव आलाय. भास्कर माजी असं या मजुराचं नाव आहे. त्याला लॉटरीच तिकीट खरेदी करायचा नाद लागला होता. यावरुन त्याच्या घरात सतत भांडणं व्हायची. पण पठ्ठयानं जिद्द सोडली नाही.
आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यानं आतापर्यंत लॉटरीच्या तिकिटांसाठी खूप पैसे खर्च केले होते. लॉटरीच्या तिकिटावरुन त्याच्या घरात सतत भांडणं व्हायची. पत्नी त्याचा राग राग करत म्हणायची, ‘इथं पोटाला खायला काही नाही आणि तुम्ही लॉटरीच्या तिकिटांवर’ पैशांची उधळण करत आहात’.
मजूर असलेल्या भास्कर माजी या नशीबवान व्यक्तीकडे पैसे नव्हते. पण तरीही लॉटरीचं तिकीट खरेदीचा नाद त्यानं सोडला नाही. लॉटरीच्या तिकिटाची किंमत 60 रुपये होती. मात्र त्याच्याकडे फक्त 40 रुपये होते. अखेर त्यानं 20 रुपये उधार ठेवत लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. नशिबानं साथ दिल्यानं अखेर तो 1 कोटींचा मालक झाला.
भास्कर माजी या मजुराच्या घरी सतत ‘अठरा विश्वे दारिद्र्य’ होतं. हा मजूर शेळीपालन करत होता. शेळ्यांसाठी तो गवत कापण्यासाठी गेला होता. त्या आधी त्यानं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. लॉटरीच्या नादामुळे अनेक लोक त्यांची टिंगलटवाळी करत होते. मात्र त्याला 1 कोटी रुपयांची लॉटरी लागल्याबद्दल तेच लोक त्याचे अभिनंदन करत आहेत.